शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डिसेंबर अखेरीस खामगाव पालिकेची ‘तिजोरी फुल्ल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:45 IST

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सप्ताह आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवत, खामगाव पालिकेने कर वसुलीसाठी ‘वर्ष’भर काम करण्याचा उपक्रम राबविला. पालिकेच्या या उपक्रमाला खामगावकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी, वर्षाच्या अखेरीस पालिकेची ‘तिजोरी’ फुल्ल झाली असून, ३१ डिसेंबर रोजी एकूण उद्दिष्टाच्या ४५ टक्क्यांपर्यंतची वसुली खामगाव पालिकेने केली आहे.सन ...

ठळक मुद्देवर्षभर कर वसुली करून गाठले ४५ टक्के उद्दिष्ट!

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सप्ताह आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवत, खामगाव पालिकेने कर वसुलीसाठी ‘वर्ष’भर काम करण्याचा उपक्रम राबविला. पालिकेच्या या उपक्रमाला खामगावकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी, वर्षाच्या अखेरीस पालिकेची ‘तिजोरी’ फुल्ल झाली असून, ३१ डिसेंबर रोजी एकूण उद्दिष्टाच्या ४५ टक्क्यांपर्यंतची वसुली खामगाव पालिकेने केली आहे.सन २0१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी थकीत आणि चालू एकत्रित मालमत्ताकराचे ९  कोटी ६४ लाख 0६ हजार ९३0 रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना पालिकेचा अतिशय संथ गतीचा प्रवास राहिला. त्यामुळे  एप्रिल २0१७ ते ऑक्टोबर २0१७ या सात महिन्यांच्या कालावधीत  केवळ ७८ लाख ८८ हजार ७९८ रुपयांची वसुली पालिकेच्या कर विभागाने केली होती. नोव्हेंबरअखेरीस एकूण उद्दिष्टाच्या केवळ ९.२२ टक्के  वसुलीपर्यंत पालिका प्रशासन पोहोचले होते; मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून प्रशानाने वसुलीसाठी मोहीम उघडली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी रविवार असतानादेखील पालिका प्रशासनाने वसुलीसाठी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले. परिणामी, पालिकेच्या कर वसुलीत वाढ झाली. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या तीन-चार दिवसांमध्ये पालिकेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता एकूण उद्दिष्टापर्यंतच्या ४५ टक्क्यांपर्यंतच्या वसुलीकडे पालिका पोहोचली आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ पर्यंत पालिकेचा कर विभाग सुरू होता. त्यानंतर लगेचच नवीन वर्षाचा पहिला दिवस उजाडला. तोपर्यंत  २२ लाख, ४0 हजार ५४६ रु. कर वसुली पालिकेने केली होती.  दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत ४ कोटी ९ लाख ६७ हजार ६४४ रुपयांची कर वसुली पालिकेने केली आहे.

कर्मचार्‍यांनी केली मोहीम फत्ते!४कर वसुलीसाठी अपेक्षित सहकार्य न करणार्‍या मालमत्ताधारकांना कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत पालिका कर्मचार्‍यांनी कर वसुली केली. यामध्ये गत आठवड्यात बुधवारपर्यंत ५0 लाख रुपयांची वसुली केली. त्यानंतर २८ डिसेंबर रोजी १0 लाख, २९ हजार १0९ रुपये, २९ डिसेंबर रोजी ११ लाख 0७ हजार ६७७ रुपये, तर डिसेंबर रोजी ३३ लाख १९ हजार २१९ रुपयांच्या कर वसुलीचा समावेश आहे.

नोटबंदीपेक्षाही अधिक प्रतिसाद!अखेरच्या दोन दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात कर वसुली झाली. ही वसुली गेल्यावर्षी नोटबंदीच्या काळात झालेल्या वसुलीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षीच्या तुलनेत साडेतीन लाख रुपयांचा फरक असून, रविवारी रात्री पालिकेच्या तिजोरीत पैसे मावत नव्हते. म्हणजेच पालिकेत असलेली एकच तिजोरीही अपुरी पडत असल्याचे चित्र होते. कर विभागातील वरिष्ठ लिपिक रितेश तिवारी, दीपक कल्याणकर, श्याम मावळे, अनिल गोलाईत, अतिश गवई, उमेश अग्निहोत्री, माधव सदावर्ते, ऋषिकेश पवार, तर रोखपाल नरेंद्रसिंह चव्हाण, कृष्णाभाऊ भोकरे यांनी नवीन वर्षाच्या पहाटेपर्यंत कामकाज सुरळीत ठेवले.

धनादेशाद्वारे ६३ लाख रुपयांची वसुली!मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने धडक मोहीम हाती घेतल्यानंतर  १५ ते ३१ डिसेंबरच्या कालावधीत ६२ लाख ९७ हजार ४0५ रुपयांचे धनादेश पालिकेच्या कर विभागाला प्राप्त झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत धनादेशाद्वारे होणार्‍या वसुलीतही सकारात्मक वाढ झाल्याचे दिसून येते.

कर वसुलीच्या अपेक्षित उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना, ३१ डिसेंबर रोजी पालिकेचे कामकाज सुरू ठेवण्यात आले. पालिकेच्या या मोहिमेला रविवारी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर कर्मचार्‍यांचेही टीमवर्क अधिक चांगले राहिले. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीच्या टक्केवारीत वाढ करणे शक्य झाले.- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावMuncipal Corporationनगर पालिका