शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

खामगाव शहर पोलिस स्टेशन, बसस्थानकावरील अतिक्रमण जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 15:26 IST

गत आठवड्यात शुक्रवारी शहर पोलिस स्टेशनसमोरील हटविण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील मुख्य रस्ते आणि प्रमुख चौकातील अतिक्रमण निमुर्लनासाठी पालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चालढकल भूमिका आहे. त्यामुळे शहराला अतिक्रमणाचा वेढा असल्याचे दिसून येते. गत आठवड्यात शुक्रवारी शहर पोलिस स्टेशनसमोरील हटविण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. त्यामुळे अतिक्रमण निमुर्लनासाठी पालिकेची बेफिकीर वृत्ती जबाबदार असल्याची ओरड होत आहे.खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान अडथळा नको म्हणून २० आॅगस्ट २०१९ रोजी नगर पालिका प्रशासनाच्यावतीने अतिक्रमकांना नोटीस बजावल्या होत्या. तात्काळ अतिक्रमण न काढल्यास तीव्र कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, या नोटीसचा कोणताही फरक शहरातील अतिक्रमण निमुर्लनासाठी झाला नाही. याउलट रस्त्याचे काम सुरू असतानाच शहरातील बसस्थानक चौक, नांदुरा रोडवर अतिक्रमण पोफावत आहे. बसस्थानकावरील अतिक्रमण जैसे थे झाले आहे. त्याचप्रमाणे नगर पालिका परिसर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर, नांदुरा रोड, टॉवर चौक, बस स्थानक परिसरातील अतिक्रमणही जैसेथे झाले आहे. फेरीवाल्याच्या गाड्याही भर रस्त्यावर उभ्या राहतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.तीन दिवसांतच अतिक्रमण जैसे थे !नियोजीत इंदिरा गांधी उद्यानानजीकचे अतिक्रमण गत शुक्रवारी पालिका प्रशासनाकडून हटविण्यात आले. त्यानंतर ही जागा मोकळी करण्यात आली. दरम्यान, मोकळ्या जागेला तारेचे कुंपन घालून संरक्षीत करण्याची भूमिका पालिकेने जाहीर केली होती. मात्र, अतिक्रमण विभागातील एका वजनदार अधिकाºयाच्या कृपादृष्टीमुळे शहर पोलिस स्टेशनसमोरील अतिक्रमण सोमवारी जैसे थे झाले आहे. वजनदार अधिकाºयाने बड्या अधिकाºयाशी चर्चा केल्यानंतर अतिक्रमणकांनी पुन्हा याठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. यामध्ये अतिक्रमकांशी अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा आहे. या व्यवहारानंतर सोमवारी पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन विभागाने इंदिरा गांधी उद्यानाचा नियोजीत फलक हटवून जप्त केला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावEnchroachmentअतिक्रमण