शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांनी घेतला खुल्या शासकीय जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:12 IST

अतिक्रमणधारकांनी आता डायट कॉलेजच्या मैदानावर आपले बस्तान हलविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत आठवडाभरापासून शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक दुकाने काढण्यात आली आहेत. काही पक्क्या बांधकामावरही जेसीबी चालविण्यात आला आहे. या अतिक्रमणधारकांनी आता डायट कॉलेजच्या मैदानावर आपले बस्तान हलविले आहे. एका ठिकाणचे अतिक्रमण हटवित नाही, तोच पुन्हा शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे.शहरातील वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या मोहिमेला वेग आला आहे. शहरात टप्प्याटप्प्याने ही मोहिम सुरू आहे. हळूहळू शहरातील सर्व रस्ते मोकळे होण्यास सुरूवात झाली आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान पक्की दुकाने असलेल्यांनी देखील अतिक्रमण थाटले असल्याचे उघड झाले होते. अतिक्रमणातील दुकाने काढताच त्यांनी स्वत: च्या मालकीच्या जागेत आपले बस्तान हलविले. मात्र ज्यांच्याकडे खरोखर स्वत:ची जागा नाही आणि त्यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे, अशांनी डायट कॉलेजच्या मैदानाचा ताबा घेत या ठिकाणी दुकाने थाटली आहे. एकीकडे रस्त्याच्या बाजूला असेलेले अतिक्रमण काढण्यात येत आहे, तर दुसरीकडे शासकीय खुल्या जागेवरच पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रकार सुरू आहे.हा प्रकार थांबल्याशिवाय अतिक्रमणास पूर्णपणे आळा घालणे शक्य होणार नाही. अतिक्रमण खºया अर्थाने हद्दपार करण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरते. यासाठी पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाओ मोहिमेबरोबरच अतिक्रमणधारकांसाठी नव्याने अधिकृत गाळे बनविण्यावरसुद्धा लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. जेणेकरून एकदा काढलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे होणार नाही. जयस्तंभ चौक ते आयडीबिआय रस्त्यावरील अतिक्रमण कायमपालिकेकडून शहरातील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येत आहे. ही सर्व कारवाई करीत असताना जयस्तंभ चौक ते आयडीबाय बँक रस्त्यावरील अतिक्रमण मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गॅरेजसह विविध वस्तुंच्या दुकानांचा समावेश आहे. शहरातील इतर दुकाने जमिनदोस्त करत असताना नेमके याच रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेकडून का काढण्यात येत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा