अतिक्रमणधारकांनी घेतला खुल्या शासकीय जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 02:12 PM2020-01-11T14:12:29+5:302020-01-11T14:12:39+5:30

अतिक्रमणधारकांनी आता डायट कॉलेजच्या मैदानावर आपले बस्तान हलविले आहे.

The encroachment holders occupied open government space | अतिक्रमणधारकांनी घेतला खुल्या शासकीय जागेचा ताबा

अतिक्रमणधारकांनी घेतला खुल्या शासकीय जागेचा ताबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत आठवडाभरापासून शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक दुकाने काढण्यात आली आहेत. काही पक्क्या बांधकामावरही जेसीबी चालविण्यात आला आहे. या अतिक्रमणधारकांनी आता डायट कॉलेजच्या मैदानावर आपले बस्तान हलविले आहे. एका ठिकाणचे अतिक्रमण हटवित नाही, तोच पुन्हा शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे.
शहरातील वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या मोहिमेला वेग आला आहे. शहरात टप्प्याटप्प्याने ही मोहिम सुरू आहे. हळूहळू शहरातील सर्व रस्ते मोकळे होण्यास सुरूवात झाली आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान पक्की दुकाने असलेल्यांनी देखील अतिक्रमण थाटले असल्याचे उघड झाले होते. अतिक्रमणातील दुकाने काढताच त्यांनी स्वत: च्या मालकीच्या जागेत आपले बस्तान हलविले. मात्र ज्यांच्याकडे खरोखर स्वत:ची जागा नाही आणि त्यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे, अशांनी डायट कॉलेजच्या मैदानाचा ताबा घेत या ठिकाणी दुकाने थाटली आहे. एकीकडे रस्त्याच्या बाजूला असेलेले अतिक्रमण काढण्यात येत आहे, तर दुसरीकडे शासकीय खुल्या जागेवरच पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रकार सुरू आहे.
हा प्रकार थांबल्याशिवाय अतिक्रमणास पूर्णपणे आळा घालणे शक्य होणार नाही. अतिक्रमण खºया अर्थाने हद्दपार करण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरते. यासाठी पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाओ मोहिमेबरोबरच अतिक्रमणधारकांसाठी नव्याने अधिकृत गाळे बनविण्यावरसुद्धा लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. जेणेकरून एकदा काढलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे होणार नाही.
 

जयस्तंभ चौक ते आयडीबिआय रस्त्यावरील अतिक्रमण कायम
पालिकेकडून शहरातील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येत आहे. ही सर्व कारवाई करीत असताना जयस्तंभ चौक ते आयडीबाय बँक रस्त्यावरील अतिक्रमण मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गॅरेजसह विविध वस्तुंच्या दुकानांचा समावेश आहे. शहरातील इतर दुकाने जमिनदोस्त करत असताना नेमके याच रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेकडून का काढण्यात येत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

 

Web Title: The encroachment holders occupied open government space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.