शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमकांचे सामंजस्य; पालिकेचे पथक परतले रिकाम्या हाती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 15:21 IST

खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सामंजस्याने सुटला. परिणामी, अतिक्रमण निमुर्लनाच्या कारवाईसाठी मंगळवारी घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

ठळक मुद्दे रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने, मंगळवारी काही व्यावसायिक प्रतिष्ठाणांचे अतिक्रमण तोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. पालिका प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारताच संबधितांनी अतिक्रमण स्वत:च काढण्याचे सामंजस्य दाखविले. 

खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सामंजस्याने सुटला. परिणामी, अतिक्रमण निमुर्लनाच्या कारवाईसाठी मंगळवारी घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

शहरातील निर्मल टर्निंग ते फरशी रस्त्याच्या बांधकामास नगर पालिका प्रशासनाच्यावतीने सुरूवात करण्यात आली आहे. रस्ता रूंदीकरणाचे काम करताना अतिक्रमकांकडून  वारंवार प्रशासनाला वेठीस धरल्या जात आहे. परिणामी, रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने, मंगळवारी काही व्यावसायिक प्रतिष्ठाणांचे अतिक्रमण तोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. यासाठी अतिक्रमण निमूर्लन पथकासह बांधकाम आणि नगर रचना विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  त्यामुळे काही काळ मुख्य रस्त्यावर तणाव निर्माण झाला. दरम्यान, मोजणीनुसार अडथळा ठरणारे बांधकाम तोडण्याचे आश्वासन व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या संचालकांनी दिले. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून पुढील कारवाई थांबविण्यात आली. एका फुटवेअरच्या दुकानासह इतरांचेही पक्के अतिक्रमण आता निघण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, याच व्यावसायिकांनी गेल्यावेळीही अतिक्रमण काढताना विरोध दर्शविला होता. त्यामुळे पालिकेला पुन्हा मोजणी करावी लागली होती. त्यानंतर आता पुन्हा अतिक्रमण काढण्यास विरोधाची धार तीव्र झाली होती. मात्र, पालिका प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारताच संबधितांनी अतिक्रमण स्वत:च काढण्याचे सामंजस्य दाखविले.  

टॅग्स :khamgaonखामगावNagar Bhavanनगरभवन