शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

बुलडाणा जिल्ह्यात शेकडो युवकांच्या हाताला मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:28 PM

बुलडाणा : राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान आणि नागरी जीवन्नोनती अभियान राबविल्या जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम झाले सुरू असून योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ७०९ युवक कौशल्य विकास साधत रोजगाराला लागले आहेत.

ठळक मुद्दे नागरी जीवन्नोनती अभियान २ हजार ६२४ युवक घेतायेत प्रशिक्षण

बुलडाणा : राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान आणि नागरी जीवन्नोनती अभियान राबविल्या जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम झाले सुरू असून योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ७०९ युवक कौशल्य विकास साधत रोजगाराला लागले आहेत.   जिल्ह्यात विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाºया संस्थांच्या माध्यमातून २ हजार ६२४ तरूण प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानातंर्गत २ हजार १३९ तरूणांना आणि राष्ट्रीय नागरी जीवनोन्नती अभियानातंर्गत ४२५ तरूणांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. यामध्ये गारमेंट, आॅटोमोबाईकल, ब्युटी पार्लर, बांधकाम, इलेक्ट्रिकल, वेल्डींग, आदिरातिथ्य, संगणक व टर्नींग व्यवसायांचा समावेश आहे. सदर प्रशिक्षण जवळपास ५४ बॅचेसमध्ये सुरू आहेत.  प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुशिक्षीत बेरोजगार तरूणाला प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्रावर तरूणांना रोजगार मिळण्यास किंवा स्वत: व्यवसाय थाटण्यामध्ये सहजता मिळते. जिल्हाभरात योजना सुरू झाल्यापासून ७०९  सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना रोजगार मिळाला आहे. या तरूणांनी जिल्ह्यात २४ बॅचेसमधून प्रशिक्षण पूर्ण केले. व्यवसायानुसार इलेक्ट्रीक व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण करणारे २०५ तरूण असून बांधकाम व्यवसाया प्रशिक्षीत होणारे ५४ तरूण आहेत. राष्ट्रीय नागरी जीवन्नोनती अभियानाद्वारे प्रशिक्षण पूर्ण करून रोजगार मिळविणारे ३० तरूण आहे. तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानानुसार ६७९ तरूणांच्या हाताला काम मिळाले आहे. भारत जगातील सर्वाधिक तरूणांचा देश असल्यामुळे येथील तरूण देशाचे भवितव्य ठरविणारे आहे. त्यांचे त्यांना हव्या असलेल्या क्षेत्रामध्ये  कौशल्य विकसीत करून त्यांना देशाच्या विकासात सहभागी करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर वेळोवेळी होत आहे. त्यामुळे कौशल्य विकास हा विभागाचे राज्य शासनाने स्वतंत्र बनविला आहे. या विभागाच्या माध्यमातून केवळ तरूणांचे कौशल्यवर्धन करण्यात येत नाही, तर त्यांना रोजगार मेळाव्यांच्या माधमातून रोजगारही मिळवून दिला जात आहे.   संगणक प्रशिक्षणामध्ये 330 तरूणांना रोजगार

जिल्ह्यातही विविध रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील कंपन्यामध्ये विविध पदांवर नोकरी देण्यात आली आहे. आदरातिथ्यसारख्या व्यवसायात प्रशिक्षित होवून हॉटेलींग करण्यामध्ये तरूणांचा कल वाढला आहे. विविध व्हीटीपीच्या माध्यमातून सदर कार्य जिल्ह्यात होत आहे. कौशल्य विकास साधत सुशिक्षीत तरूणांचा कल स्वयंरोजगाराकडे वाढला असून संगणक प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील ३३० तरूणांना रोजगार मिळाला आहे.

टॅग्स :Buldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय