शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारातून २६ लाख युवकांना रोजगार

By admin | Updated: June 24, 2015 01:28 IST

दोन लाख सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग कार्यरत.

बुलडाणा : वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणार्‍या उद्योगांच्या आधारे राज्यातील अनेक बेरोजगार युवकांनी स्वत:साठी रोजगाराची निर्मिती केली आहे. राज्यात असे २ लाख ११ हजार सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग कार्यरत असून, या माध्यमातून २६ लाख ९५ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे.सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना केंद्र सरकारकडून विशिष्ट प्रोत्साहन दिले जाते आहे. यासाठी शासनाच्या सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजू व सुशिक्षीत बेरोजगारांसाठी जिल्हा उद्योग केंद्रच्या माध्यमातून लघू उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. वस्तुनिर्माण उद्योग आणि सेवा पुरविणारे उद्योग यात सुक्ष्म, लघु व मध्यम असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, क्रीडा, अन्न, गृहउद्योग, खादी ग्रामउद्योग, दुग्ध व्यवसाय, अभियांत्रिकी, कृषी, गृहनिर्माण आदी क्षेत्रातील मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करुन या तरुणांनी वेगळी ओळख निर्माण केली. सात वर्षात गुंतवणूक व रोजगार वाढलासूक्ष्म,लघु व मध्यम उपक्रमांच्या २00६-0७ साली झालेल्या चवथ्या गणनेनुसार राज्यात ३१ मार्च २00७ रोजी एकूण ८६,६६५ उद्योग कार्यरत होते. त्यामधील गुंतवणूक १४,८५९ कोटी रूपये, तर १0.९५ लाख रोजगार होता. गेल्या सात वर्षात यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. २0१४-१५ या आर्थिक वर्षात ५0,६३७ कोटी रूपये गुंतवणुकीचे २,११,४0३ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम कार्यरत असून, त्यामधून २६.९५ लाख रोजगार निर्माण झाला आहे.रोजगारासाठी जॉब पोर्टलसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणार्‍यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र पोर्टल सुरू केले. याचा फायदा राज्यातील बेरोजगारांना होणार आहे. उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. उद्योग व रोजगाराचा विभागनिहाय आलेख (२0१५)विभाग        उद्योग              रोजगारमुंबई           २१८९५        ३.६६कोकण           ३४६१३      ५.८४नाशिक           २४२७९      २.९७पुणे                ८३0३३       ९.४२औरंगाबाद       १४८५९       १.७0अमरावती       १0६४२        १.0१नागपूर           २२0८२         २.३५एकूण               २११४0३        २६.९५