संग्रामपूर : पंचायत समितीमध्ये स्वच्छ भारतसाठी कर्मचारी व अधिकार्यांनी नियमितपणे दर गुरूवारी श्रमदानातून साफसफाई करण्याचा संकल्प केला आहे. देशभर स्वच्छ भारत उ पक्रमासाठी शासकीय कार्यालयासह शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत. मात्र या उपक्रमाला पंचायत समितीकडून बेदखल केल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने शनिवार २५ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करताच रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सभापती, सदस्य यांनी या मोहीमेचा शुभारंभ केला. ही मोहीम केवळ सदस्यांपुरती र्मयादीत राहू नये म्हणून पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी यांनीही पुढाकार घेतला आहे.
‘स्वच्छ भारत’साठी कर्मचा-यांचा पुढाकार
By admin | Updated: October 27, 2014 22:46 IST