शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य

By admin | Updated: August 10, 2016 00:07 IST

शेकडो निष्पापांचा मृत्यू; जनतेत संताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा), दि. ९ : तालुक्यातून गेलेल्या जालना देऊळगावराजा ते चिखली या ८0 कि.मी.च्या राज्य महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठय़ा खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालक व प्रवाशी अत्यंत त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. चौपदीकरणाच्या नावाखाली या राज्य महामार्गाचे नवनिर्माणाचे काम भिजत घोंगडे बनले आहे. चौपदरीकरण होणार असल्याने तत्कालीन कंत्राटदारांनी पुर्वीचा रस्ता पुर्णपणे उखडून टाकला. जे काम त्या काळात झाले ते कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने महिनाभरात गिट्टी बाहेर आली. अशा अनेक अडचणी उभ्या राहिल्याने चौपदरीकरण फक्त म्हणण्यापुरते राहिले आणि पाच ते सहा वर्षाच्या काळात शेकडो निष्पापांना या राज्य महामार्गावर जीवाला मुकावे लागले. प्रारंभी चौपदीकरणाच्या कामासाठी कंत्राटदार आले. कामही सुरू झाले. पण दर्जा निकृष्ट दिसून आल्याने काम बंद पडले. ते आजतागायत बंदच आहे. पुढे हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करण्यात आला. अद्यापही या रस्त्यावर काम सुरू झालेले नाही आणि हा राज्य महामार्ग हस्तांतरीत झाल्याच्या नावाखाली राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आम्हाला आता काम करता येत नसल्याचे सक्षम? कारण देत हात वर केल्याने या राज्य महामार्गाच्या दयनीय अवस्थेला कुणीच वाली नसल्याचे दुर्देव समोर येत आहे.