शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हक्कापेक्षा ‘अर्थ’कारणावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:58 IST

शिक्षणाच्या अधिकारापेक्षा (आरटीई) ‘अर्थ’कारणाला महत्त्व दिल्या जात असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशापासून वंचीत रहावे लागते.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आरटीई अंतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी शासनाकडून प्रवेश शुल्क प्रतिपुर्ती अनुदान वेळेवर मिळत नसल्याची ओरड होत आहे. गत वर्षीचे आवश्यकतेपेक्षा केवळ २८ टक्के अनुदान जिल्हा परिषदकडे आले आहे. मात्र अद्याप त्याचे वितरण झाले नाही. त्यात शाळांकडूनही शिक्षणाच्या अधिकारापेक्षा (आरटीई) ‘अर्थ’कारणाला महत्त्व दिल्या जात असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशापासून वंचीत रहावे लागते.शिक्षक हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी नामांकित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत दिल्या जातात. आरटीई अंतर्गत राबविण्यात येणाºया मोफत प्रवेश प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील २२० शाळांचा समावेश करण्यात आला आहे. तर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये १८० शाळांमध्ये आरटीईतून मोफत प्रवेश देण्यात आले होते. या प्रवेश शुल्काच्या प्रतिपुर्तीसाठी शासनाकडून दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते. मात्र शाळांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याने मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शाळा व संस्थाचालक दुर्लक्ष करतात. परिणामी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशापासून दूर ठेवले जाते. २०१८-१९ या वर्षामध्ये आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या जिल्ह्यातील १८० शाळांसाठी ५ कोटी ८९ लाख १८ हजार २४० रुपये शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती आवश्यक आहे. परंतू मागील वर्षीच्या प्रतीपुर्तीची रक्कम २०१९-२० हे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही मिळाली नव्हती. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही अर्ध्या शैक्षणिक सत्रापर्यंत मोफत प्रवेशाची प्रक्रिया रेंगाळत राहिली. दरम्यान, बुलडाणा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने वारंवार मागणी केल्यानंतर केवळ २८ टक्केच निधी प्राप्त झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात बुलडाणा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे १ कोटी ७० लाख ५३ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आला आहे.महिनाभरात निधी वितरण?गतवर्षीच्या १८० शाळांसाठी आलेला निधी अद्याप जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आहे. या निधी वितरणासाठी पंचायत समिती स्तरावरून शाळांची माहिती मागविण्यात आलेली आहे. जवळपास महिन्याभरात या निधीचे विरतण होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.दोन वर्षापूर्वीचा ५० टक्के निधी प्रस्तावितआरटीई अंतर्गत २०१७-१८ मध्ये पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शाळांना आतापर्यंत केवळ ५० टक्के निधीचे वितरण झाले आहे. दोन वर्षापूर्वीचा ५० टक्के निधी अद्याप प्रस्तावित आहे. प्रवेश शुल्क प्रतिपुर्ती होत नसल्यानेआरटीईमध्ये बसणाºया शाळांकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दिरंगाई होते.

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शाळांची शुल्क प्रतिपुर्ती लवकरच शाळांच्या बँक खात्यावर जमा होईल. २५ टक्के मोफत प्रवेशापासून गोरगरीब विद्यार्थी वंचीत राहणार नाही, यासाठी योग्य ते नियोजन केले आहे.- एजाजुल खान,प्राथमिक शिक्षणाधिकारी बुलडाणा.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदा