शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्र मागितल्याने कर्मचा-यांमध्ये धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:45 IST

न्यायालयाने नोकरीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिल्यामुळे शासनाच्यावतीने सर्व विभागातील कर्मचारी व अधिका-यांना जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) व प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत मागितली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये धडकी भरली असून,  सध्या सर्व कर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न झाले आहे.

ठळक मुद्देआरक्षित जागेवरील पदोन्नती रद्दच्या निर्णयानंतर शासनाने मागितले प्रमाणपत्रकर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न 

विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :   न्यायालयाने नोकरीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिल्यामुळे शासनाच्यावतीने सर्व विभागातील कर्मचारी व अधिका-यांना जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) व प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत मागितली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये धडकी भरली असून,  सध्या सर्व कर्मचारी प्रमाणपत्र गोळा करण्यात मग्न झाले आहे.शासनाच्यावतीने विविध विभागातील अनेक कर्मचाºयांना नोकरीमध्ये जातीनिहाय आरक्षणानुसार पदोन्नती देण्यात आली. मात्र, त्यावर आक्षेप घेत नोकरीमध्ये पदोन्नती देत असताना आरक्षण लागू करू नये, असा निर्णय नॅकने दिला. सदर निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. हा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवताच सरकारला तीन महिन्यांचा कालावधीही दिला आहे. न्यायालयानेच या निर्णयाला तीन महिन्यांचा स्थगनादेश दिला. त्यामुळे आरक्षित जागेवर कुणाला पदोन्नती दिली, राज्यात अशा कर्मचारी, अधिकाºयांची संख्या किती याची माहिती शासनाच्यावतीने गोळा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी- अधिकारी, शिक्षक यासह  विविध विभागातील कर्मचारी व अधिकाºयांना प्रथम नियुक्ती आदेश व जात वैधता प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र गोळा करण्यात कर्मचारी मग्न आहेत. राज्यात आरक्षित कोट्यातून पदोन्नती मिळविणाºया कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करते की न्यायालयाचा आदेश मान्य करून पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांना पुन्हा पूर्वीच्या पदावर पाठविते, याबाबत कर्मचाºयांमध्ये उत्सूकता आहे. सध्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रे गोळा करण्यात कर्मचारी व्यस्त झाले आहेत.

अधिका-यांना पुन्हा पूर्वीच्या पदावर काम करण्याची भीतीन्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाच्यावतीने यादी मागविण्यात आली आहे. न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिला आहे. आता शासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाचा निर्णय मान्य केल्यास अनेकांची पदोन्नती रद्द होणार असून, त्यांना पूर्वीच्या जागी काम करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांमध्ये धडकी भरली आहे.

तीन महिने पदोन्नती सुरूच राहणारन्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे यादरम्यान आरक्षित कोट्यातून पदोन्नती न थांबविता शासनाने तीन महिने सदर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आरक्षित कोट्यातून पदोन्नतीचे प्रस्ताव स्थगित न करता त्याला मान्यता देण्यात येणार आहे.