शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

घाटाखाली काँग्रेसचा शासनाच्या विरोधात ‘एल्गार’

By admin | Updated: May 20, 2017 00:46 IST

राहुल बोंद्रे यांच्या बेमुदत उपोषणाचे रस्त्यावर उतरून समर्थन; शेगावात २५ कार्यकर्ते ताब्यात

शेगाव : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनासाठी युवक कॉंग्रेसच्यावतीने शुक्रवार, १९ मे रोजी शेगावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी २५ कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली.तूर खरेदीबाबत शासन उदासीन असून, अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तुरीचे मोजमाप व बारदाण्याचा अभाव, मोजणीसाठी काट्याचा अभाव, खरेदी झालेल्या तुरीचे पैसे देण्यास होणारी कुचराई यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पूर्वी २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले. आता ३१ मेपर्यंतची मुदतवाढ देऊन शासनाने चालढकल सुरू केली आहे. २२ एप्रिलपर्यंत नोंद असलेल्या तुरीची अद्याप खरेदी झालेली नाही. १० एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देण्यात आले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसने तूर प्रश्नी छेडलेले आंदोलन चिघळतच चालले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी शेगाव शहरात तालुका आणि शहर कॉंग्रेसकडून ‘रास्ता रोको’ करण्यात आले. शेगावात पक्षनेते रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक येथे पार पडलेल्या ‘रास्ता रोको’ कार्यक्रमात तालुका अध्यक्ष अशोक हिंगणे, अमित जाधव, नईम सेठ, दीपक सालामपुरीया, फिरोज खान, पं.स.सदस्य इनायतउल्ला खान, रहीम खान, संतोष माने, आबिद शाह, पवन पचेरवाल, सयेद नासीर सैलानी, रशिद, डॉ. सखाराम वानखडे, काका सोलंकर शेजोळे, शिवाजी थोरातसह २५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. घाटाखाली ‘रास्ता रोको’ ला प्रतिसादखामगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको २२२आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला घाटाखालील शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा या तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. कांद्याचे भाव पडल्याने संग्रामपूर येथे कांदा रस्त्यावर फेकत उग्र आंदोलन केले.मलकापुरातही रास्ता रोको आंदोलनमलकापूर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व तूर खरेदी झालीच पाहिजे, या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे तथा कॉंग्रेस पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. त्या समर्थनार्थ मलकापुरात कॉंग्रेसच्यावतीने शुक्रवारी दुपारी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील आयटीआय कॉलेजसमोरील ऊंबर नाल्यावरील पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात पक्षनेते डॉ.अरविंद कोलते, नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, शहर अध्यक्ष राजू पाटील, प्रा.डॉ.अनिल खर्चे, हाजी रशीदखा जमादार, नगरसेवक जाकीर मेमन, अनिल गांधी, रोहन देशमुख, अनिल बगाडे, अनिल जैसवाल, मनोहर पाटील, फिरोज खान, बंडू चौधरी, विनय काळे , गजानन ठोसर, कलीम पटेल आनंद पुरोहित, आनंद नाईक, राजू उखर्डे, सुनील बगाडे, किशोर गनबास, आदी पदाधिकारी तथा कार्यकर्तेे प्रामुख्याने सहभागी झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक व सुटका नांदुरा : शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे तसेच शेतकऱ्यांच्या तूर खरेदीस होणारा विलंब, तुरीचे चुकारे मिळण्यास लागणारा वेळ व संपूर्ण कर्जमाफी यासाठी काँग्रेसच्यावतीने आंदोलने, संघर्ष यात्रा, उपोषणे करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नांदुरा येथेही शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने रस्ता जाम आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी तात्पुरती अटक व नंतर सुटका केली. काँग्रेसचे बलदेवराव चोपडे, विजयसिंग राजपूत, संतोष पाटील, नीलेश पाऊलझगडे, भगवान धांडे, अ‍ॅड. मोहतेशम रजा, गौरव पाटील, विनल मिरगे, आसीफखॉ, अजिंक्य चोपडे, बंटी पाटील व मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी सदर आंदोलनात सहभागी झाले होते.