शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील २२ गावांतील दलित वस्त्यांचे विद्युतीकरण पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:04 IST

बुलडाणा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १00 टक्के विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील १९२ गावात अभियान राबविण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्हय़ातील २२ गावांतील दलित वसत्यांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आली असून, आता वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामस्वराज्य अभियानांतर्गत महावितरणची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १00 टक्के विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील १९२ गावात अभियान राबविण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्हय़ातील २२ गावांतील दलित वसत्यांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आली असून, आता वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.राज्यातील ज्या गावात ८0 टक्यापेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावात १00 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असून, यात बुलडाणा जिल्ह्यातील २२ गावांमध्ये जवळपास ५00 नवीन वीज जोडण्यात देण्यात येणार आहे.  त्यासाठी स्थानिक पातळीवर शिबिरही घेण्यात येत असून, लाभार्थींना तत्काळ वीज जोडणी दिली जाईल. दरम्यान, ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे त्यांना थकबाकीची रक्कम भरली तरच योजनेचा लाभ घेता येईल. सौभाग्य योजनेतील तरतुदींप्रमाणे १00 टक्के वीज जोडणी दिल्या जाणार आहे.

३0 एप्रिलपर्यंत अभियानपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रधानमंत्री हर घर बिजली योजना’ अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. १४ एप्रिल ते ३0 एप्रिल या दरम्यान संपूर्ण राज्यात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. सोबतच शिबिरे घेण्यात येऊन जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यात येणार असून, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

या गावातील विद्युतीकरणाचे काम पूर्णबुलडाणा मंडळातील शेगाव उपविभागातील कालखेड, पाळोदी, तरोडा कसबा, नांदुरा उपविभागातील, पिंपळखुटा धांडे, दहीवाडी, मलकापूर उपविभागातील बहापुरा, खामगाव उपविभागातील पोराज, लोखंडा, पळशी खु., बोरी, आसा, मेहकर उपविभागातील थारबरडापूर, मारोती पेठ, उमरा, बुलडाणा उपविभागातील साखळी खु., चिकला, देऊळगाव उपविभागातील सावंगी टेकाडे, बोराखेडी, सिंदखेड उपविभागातील मोहाडी , गोरेगाव तर लोणार उपविभागातील राजेगाव सिद्धखेड, सोयानदेव या गावातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा