शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरात ११.५० लाखांची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 11:57 IST

Buldhana Electricity Theft News महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७६ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/मेहकर: मेहकर येथील जानेफळ मार्गावर कंचनीच्या महालाच्या डावीकडील बाजूला पालिकेतंर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलांमध्ये राहणाऱ्यांनी आकोडे टाकून तब्बल ६७ हजार युनीट म्हणजेच ११ लाख ५० हजार रुपयांच्या विजेची चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात चार नोव्हेंबर रोजी मध्यरात्री  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७६ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत उईके यांनी या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिसांसह महावितरणच्या पथकाला समवेत घेवून मेहकर-जानेफळ मार्गावरील पालिकेने उभारलेल्या घरकुलांच्या परिसरात पाहणी केली असता जवळूनच गेलेल्या अनिकट रोहीत्राच्या लगुदाब वीज वाहिनीवरून अनेकांनी येथे आकोडे टाकून वीज चोरी केली असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांच्या व पंचांच्या उपस्थितीत येथे प्रकरणी कारवाई करण्यात येवून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेले वायर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. स्थानिक पातळीवर चौकशी केली असता काही ठिकाणी नागरिक राहत असले तरी त्यांना पालिकेकडून अद्याप घरकुलांचे हस्तांतरण झाले नसल्याचे कारवाई करण्यास गेलेल्या पथकाच्या निदर्शनास आले तर काहींची घरे बंद होती. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या यंत्रणेने तेथील साहित्य जप्त केले होते. सोबतच प्रकरणी चार नोव्हेंबरला मध्यरात्री उशिरा या प्रकरणात बुलडाणा पोलिस ठाण्यात ७६ जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या ठिकाणी जवळपास ६७ हजार युनीट वीज चोरी झाल्याने महावितरणचे ११ लाख ५० हजारांचे नुकसान झाले असून हा गुन्हा आता मेहकर पोलिसात वर्ग होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणाMehkarमेहकर