शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

 जिल्ह्यात १०७ कोटींचे वीज बिल थकले! पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा होणार सुरू

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 27, 2023 17:43 IST

वीज बिलाच्या थकबाकीत झालेली वाढ ही महावितरणसाठी गंभीर बाब आहे.

बुलढाणा : वीज बिलाच्या थकबाकीत झालेली वाढ ही महावितरणसाठी गंभीर बाब आहे. परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडील १०७ कोटी रूपयांच्या वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही वीज बिल वसुली मोहिमेला आता वेग आला आहे.

परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे या वसुली मोहिम तीव्र करून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा तत्काळ ऑनलाईन प्रणालीत भरण्याचे बंधन करण्यात आले असल्याने, संपूर्ण थकबाकीसह सींगल फेज साठी ३६० आणि थ्री फेज साठी ६१४ रूपयाचे पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय त्या ग्राहकाचा वीज पुरवठा सुरू करता येत नाही. महिन्याचे शेवटचे चार दिवस बाकी असताना परिमंडलाअंतर्गत बुलढाणा जिल्हा १०७ कोटी रूपयाचे थकीत वीजबिल येणे बाकी आहे.

शनिवार व रविवार सुरू राहणार विजबिल भरणा केंद्रेमहावितरणच्या वीजबिल वसुली मोहिमेत बिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. ग्राहकाची गैरसोय होऊ नये आणि महावितरणची वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळता यावी, यासाठी महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहक ऑनलाईन पध्दतीने महावितरण संकेतस्थळ, मोबाईल ॲप इत्यादी पध्दतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सोय आहे.

खंडित वीज पुरवठ्याची अधीक्षक अभियंताकडून तपासणीवीज पुरवठा खंडित केल्यानंतरही वीज बिल वसुली होत नसल्याने अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याकडून आकस्मिकपणे अश्या ग्राहकांची तपासणी करण्याला वेग दिला आहे. जर ग्राहकांकडे अनधिकृत वीज पुरवठा सुरू असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांवर वीज चोरी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाelectricityवीज