शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रीक वाहनांचे कार्यालयातच होते चार्जिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:51 IST

ईलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी कार्यालयातील विजेचा दुरूपयोग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पेट्रोल वाहनांना पर्याय म्हणून अनेकांची ईलेक्ट्रीक वाहनांना पसंती आहे. खामगावात देखील या वाहनांकडे एक पर्याय म्हणून पाहल्या जात असतानाच, ईलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी कार्यालयातील विजेचा दुरूपयोग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उघडकीस आला आहे.पेट्रोल वाहनांना सुलभ पर्याय म्हणून गत काही वर्षांपासून ईलेक्ट्रीक आणि रिचार्जेबल वाहनांना अनेकांकडून पसंती दिली जात आहे. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत काही कर्मचाऱ्यांनीही इलेक्ट्रानिक्स वाहने खरेदी केली आहेत. आता ही वाहने चार्जिंग करण्यासाठी चक्क शासकीय रूग्णालयातील वीजेचा वापर या कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहे.. याकडे वरिष्ठांचे दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.एका गाडीच्या चार्जिंगसाठी लागतात ३ युनिट!ईलेक्ट्रानिक्स वाहनाची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सामान्यपणे ८-९ तास लागतात. ८-९ तासात बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही गाडी ४० किलो मीटर अंतरापर्यंत चालते. दरम्यान, एकदा बॅटरी चार्ज करण्यासाठी ३ युनिट वीजेचा वापर होतो. काही कर्मचारी आपली वाहने चार्जिंग करण्यासाठी सामान्य रूग्णालयाच्या वीजेचा वापर करतात. परिणामी, शासकीय रूग्णालयात दररोज १० ते १२ युनिट विजेचा अपव्यय होत असल्याची चर्चा आहे.

बाह्यरूग्ण विभागात वाहनांचा मुक्त प्रवेश!सामान्य नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी तसेच उपचारासाठी सामान्यपणे बाह्यरूग्ण विभागाला प्राधान्य देतात. खामगाव येथेही बाह्यरूग्ण कार्यान्वित आहे. या विभागात चक्क रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक उभे असतानाच कर्मचारी आपली वाहने थेट औषध वाटप आणि नेत्ररोग विभागाच्या बाजूला असलेल्या पोर्चमध्ये आपली वाहने चार्जिंगसाठी नेत असल्याचे दिसून येते. गत अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन