शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सहकारी सोसायटी व बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 11:20 IST

Khamgaon News : कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे झाले असून, कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. 

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्या व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे झाले असून, कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यातील १३ पैकी १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपली आहे. शेगाव बाजार समिती वगळता खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, मोताळा, चिखली बाजार समित्यांमध्ये सध्या प्रशासक कामकाज पाहात आहेत. यापैकी काही बाजार समित्यांनी मुदत संपून दोन वर्षे झाले आहेत.  मार्च, २०२० पासून बाजार समित्यांची निवडणूक झाली नाही. दरवर्षी निवडणुकीबाबत नवीन निर्णय होतो. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यात येतात. या वर्षी ३१ ऑगस्टनंतर निवडणुका घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ २२ ऑगस्ट, २०२० रोजी संपला आहे. तेव्हापासून येथे प्रशासक आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांआधी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका ३१ ऑगस्ट, २०२१ नंतर घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नेहमी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका ३१ सप्टेंबरनंतरच घेण्यात येतात. सेवा सहकारी सोसायट्यांमधील मतदार शेतकरी असतात. जून ते सप्टेंबरपर्यंत कृषीचा हंगाम सुरू असतो. या दरम्यान निवडणुका घेतल्या, तर शेती कामे प्रभावित होतात. त्यामुळे नेहमी सेवा सहकारी सोसायट्यांची निवडणूक ३१ सप्टेंबरनंतर घेण्यात येते. या वर्षी ३१ ऑगस्टची मुदत देण्यात आली असली, तरी अद्याप निवडणुकांची कोणतीही तयारी सुरू झाली नाही. 

मर्ज केलेल्या सेवा सहकारी सोसायट्या झाल्या रद्द      सेवा सहकारी सोसायट्या मर्ज करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार, शेगाव, नांदुरा, मलकापूरच्या सेवा सहकारी सोसायट्या मर्ज केल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्या मर्ज केल्या नसल्यामुळे ज्या तालुक्यातील मर्ज केल्या होत्या, त्याही रद्द करण्यात आल्या.  

कोरोनामुळे मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाजार समित्यांची निवडणूक ३१ ऑगस्टपर्यंत न घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. पुढील आदेश आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील शेगाव वगळता, सर्व बाजार समित्यांची मुदत संपली आहे.- एन.ए. कृपलानी, प्रभारी निबंधक, बुलडाणा

टॅग्स :khamgaonखामगावElectionनिवडणूक