शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा नगराध्यक्षपदाची निवडणूक २५ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:21 IST

मोताळा : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक २५ मे रोजी होत आहे. सध्या कार्यरत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्ष पदासाठी पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले होते. सव्वा वर्षाचा कार्यकाळ अनुक्रमे माधुरी पुरुषोत्तम देशमुख व सुवर्णा अंनंतराव देशमुख यांनी सांभाळला होता. आता पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे.

मोताळा : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक २५ मे रोजी होत आहे. सध्या कार्यरत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे.मोताळा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये  रुपांतर झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले होते. त्यामध्ये सव्वा वर्षाचा कार्यकाळ अनुक्रमे माधुरी पुरुषोत्तम देशमुख व सुवर्णा अंनंतराव देशमुख यांनी सांभाळला होता. आता पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे. त्यानुषंगाने येत्या २५ मे रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यात नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज २१ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत दाखल करता येणार असून त्याच दिवशी उमेदवारी अर्जाची छानणी करण्यात येईल. २३ मे रोजी बुधवारी पात्र उमेदवरांची यादी प्रसिद्ध होईल तर २४ मे हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. २५ मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रत्यक्षात पारपडले. सकाळी दहा ते दुपारी १२ वाजेदरम्यान प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया पारपडले.उपाध्यक्ष पदासाठी २५ मे रोजीच सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. नगराध्यक्षांच्या निवडणुकीनंतर उपाध्यक्षपदाच्या अर्जाची छाननी करण्यात येऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनीटांचा अवधी दिल्या जाईल. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी वाचून लगोलग उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येईल, असे सुत्रांनी स्पष्ट केले. मलकापूरचे उपविभागीय अधिकारी यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. त्यांना मुख्याधिकारी गावंडे हे सहकार्य करतील. दरम्यान, या निवडणुकीमुळे मोताळा नगर पंचायतीमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळाnagaradhyakshaनगराध्यक्ष