तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यात ११ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत कवठळ सरपंच श्रीराम तुळशीराम गावंडे, उपसरपंच ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघमारे, पळसखेड दौलत सरपंच नेहा निरज गायकवाड, उपसरपंच समाधान प्रकाश गायकवाड, भालगाव सरपंच मंगला गणेश परिहार, उपसरपंच प्रियंका गजानन पोपळघट, मुरादपूर सरपंच ज्योती अनंता गाडेकर, उपसरपंच विष्णू भगवान गाडेकर यांची निवड करण्यात आली. खैरव सरंपच रिक्त असून, उपसरपंच विलास दशरथ कुटे यांची निवड झाली. रोहडा सरपंचपदी नारायण रमेशअप्पा चित्राळे, उपसरपंच रमेश सोनाजी जाधव, काटोडा सरपंच माधुरी प्रदीप थीगळे, उपसरपंच अशोक गंगाधर धुड, चांधई सरपंच कोकीळा प्रतापसिंग सोळंके, उपसरपंच सविता सुरेश इंगळे, अंत्री खेडेकर सरपंच पूजा सचिन खेडेकर, उपसरपंच सुनिता भास्कर मोरे, अंचरवाडी सरपंच कोकीळा समाधान परिहार, उपसरपंच ज्योती सुनिल परिहार, मेरा बु. सरपंच अनिता लक्ष्मण वायाळ, उपसरपंच दिनकर दौलत डोंगरदिवे, आमखेड सरपंच नंदा ज्ञानेश्वर वाघ, उपसरपंच शितल अविनाश गवई, भरोसा सरपंच संगिता गणेश थुट्टे, उपसरपंच नंदा डिगांबर जाधव, देऊळगाव धनगर सरपंच मालता गणेश जोहरे, उपसरपंच सरला नारायण घुबे, मलगी सरपंच सुमित्रा विनायक साप्ते, उपसरपंच देवानंद अच्युतराव साळवे, अमोना सरपंच प्रल्हाद अंबादास इंगळे, उपसरपंच लहु गुलाब वानखेडे, शेळगाव आटोळ सरपंच सुरेशा सुरेश राजे, उपसरपंच संतोष भगवान बोर्डे, गांगलगाव सरपंच श्रीकृष्ण मदनराव म्हस्के, उपसरपंच छाया प्रतापराव अराख, कोलारा सरपंच वनिता रामेश्वर सोळंकी, उपसरपंच गौतम किसन मघाडे, मंगरूळ ई. सरपंच माधुरी ज्ञानेश्वर वरपे, उपसरपंच सुनिल विक्रम वायाळ याप्रमाणे ग्रा.पं.सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्यातही २० ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST