शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठीचे ११० वर्षात आठवे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 23:15 IST

Khamgaon-Jalna railway line रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी येणारी ही पहिलीच समिती नसून यापूर्वी तब्बल आठ वेळा असे सर्वेक्षण झाले आहे.

ठळक मुद्दे १९१० मध्ये या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या. १९१२ मध्ये पहिले, त्यानंतर १९२६ मध्ये दुसरे सर्वेक्षण झाले.स्वातंत्र्योत्तर काळात १९८४, १९९१, १९९४, २००२, २०१० मध्ये सर्वेक्षण झाले होते.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी मुंबई सर्वेक्षण विभागाचे पाच सदस्यीय रेल्वेमार्ग सर्वेक्षण समिती जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण दोऱ्यावर आली आहे. मात्र शतकोत्तर प्रलंबित असलेल्या या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी येणारी ही पहिलीच समिती नसून यापूर्वी तब्बल आठ वेळा असे सर्वेक्षण झाले आहे. प्रत्येक वेळी त्याचे फलनिष्पतती ही बुलडाणेकरांचा भ्रमनिराश करणारी ठरली आहे. त्यामुळे आताच्या सर्वेक्षणातून सकारात्मक बाबीच समोर याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुमारे २४ हजार कोटी रुपयांची अर्थव्यवस्था असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील व्यापार, कृषी, उद्योग व तत्सम क्षेत्रातील उलाढालीचा आढावा घेऊन रस्ते वाहतूक, बस वाहतुकीद्वारे होणारी उलाढाल याचा साकल्याने विचार करून सध्याची आलेली समिती त्यांचा अहवाल देणार आहे. मात्र जेथे मुळातच दळणवळणाची साधणे कमी आहेत, तेथे उद्योगांचा विकास कसा होईल. त्यातच बुलडाणा अैाद्योगिकदृष्ट्या डी-प्लसमध्ये आहे. परिणामी त्याची उलाढालही सर्वश्रृत आहे. झारखंडमधून जालन्यात स्टील उद्योगासाठी किती कच्चा माल जातो, याचा शोध समितीने पाच जानेवारी रोजी घेतला. त्या पार्श्वभूमीवर केवळ असा शोध न घेता पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास दोन्ही जिल्ह्यात उद्योगांची भरभराट होईल व रेल्वेमार्गही नफ्यात येईल. त्यादृष्टीने समितीने किमान सकारात्मक भूमिका या सर्वेक्षणात घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होतेय. केवळ सर्वेक्षणापुरता हा मर्यादित न राहता रेल्वेमार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आता कंबर कसायला पाहिजे. अन्यथा हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहील. त्याचे कारणही तसेच आहे. १९१० मध्ये या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या. १९१२ मध्ये पहिले सर्वेक्षण झाले. त्यानंतर १९२६ मध्ये दुसरे सर्वेक्षण झाले. त्यानंतर रखडलेला या मार्गासाठी स्वातंत्र्योत्तर काळात १९८४, १९९१, १९९४, २००२, २०१० मध्ये सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर आता २०२१मध्ये आठव्यांदा सर्वेक्षण होत असल्याची माहिती रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य तथा अभ्यासक किशोर वळसे यांनी दिली.

१९२६ मध्ये लागणार होता ३३ लाख खर्चया रेल्वेमार्गासाठी १९२६ मध्ये दुसऱ्यांचा सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर या १६२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गासाठी त्यावेळी ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. जो की आता ११० वर्षांनंतर साधारणत: १३०० कोटींच्या आसपास जात आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त  १९२६मध्ये चिखली तालुक्यातील उंद्री परिसरात रेल्वे रुळासाठी माती कामही झाले होते. तसेच उंद्री येथे कामगारांचा एक कॅम्पही लागला होता. मात्र १९२९च्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचे ढग जगावर घोंघावू लागल्यामुळे प्रस्तावित रेल्वेमार्ग गुंडाळल्या गेला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावJalanaजालनाIndian Railwayभारतीय रेल्वे