शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात नऊ दिवसात आठ टँकरला ‘ग्रीन सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:25 IST

मे अखेरीस पाणीटंचाई निर्माण झाल्याने गेल्या नऊ दिवसात आठ टँकरला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात मान्सूनच्या तोंडावर पाणीटंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मे अखेरीस पाणीटंचाई निर्माण झाल्याने गेल्या नऊ दिवसात आठ टँकरला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.मगील वर्षी मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा जिल्ह्याला सहन कराव्या लागल्या. त्यामुळे टँकरची संख्याही वाढली होती. अनेक गावांमध्ये टंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण करण्यात आले होते. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचे प्रमाण वाढले होते. अनेक नदी, नाले, विहिर तुडूंब भरले होते. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो झाले होते. पाणी पातळी वाढल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. आता मान्सून तोंडावर आलेला असताना मे अखेरीस पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजनांना वेग आला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आठ टँकरला मान्यता देण्यात आली आहे. सुरू करण्यात आलेले हे सर्व टँकर ग्रामीण भागासाठी आहेत. त्यामध्ये मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा, बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, हनवतखेड, चिखली तालुक्यातील मेरा. बु, बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी, सावळा, पाडळी व चिखली तालुक्यातील कोलारा या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर सुरू करण्यात आले आहे. अशा केल्या उपाययोजनामागील आठवड्यात पाणीटंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील सात, मलकापूरमधील दोन, मेहकर तालुक्यातील १३, लोणारमधील चार, सिंदखेड राजामधील एक, मोताळा तालुक्यातील सात, जळगांव जामोदमधील १५, शेगांव एक व नांदुरा तालुक्यातील एका गावासाठी ४८ विंधन विहीरीला मान्यता देण्यात आली आहे. नऊ कुपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण ५१ गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

टेकडी तांडा येथे पिण्याच्या पाण्याचे टँकरदिवसाला एक टँकर टंचाई निवारणार्थ मंजूर करण्यात येत आहे. मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू करण्यासाठी २९ मे रोजी मान्यता देण्यात आली आहे. टेकडी तांडा येथील लोकसंख्या ३५० असून टँकरद्वारे गावाला दररोज १२ हजार ५० लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार या गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्यााची साधने या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई