शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जळगावच्या व्यक्तीसोबत केला होता नांदुऱ्यातील ८ जणांनी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 19:24 IST

पुणे ते  नांदुरा असा प्रवास केला होता, अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

लोकमत न्युज नेटवर्क नांदुरा: कोविड-१९ आजारामुळे मृत्यू झालेल्या जळगाव जामोदच्या व्यक्तीसोबत नांदुरा शहरातील १, तालुक्यातील चांदुर बिस्वा येथील ७  व मलकापुरच्या एकाने १६ मे रोजी  तो जळगावात आला त्यावेळी पुणे ते  नांदुरा असा प्रवास केला होता, अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे.   जळगाव जामोद येथे पुण्याहून १६ मेरोजी आलेल्या आलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान खामगाव येथील कोविड रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जळगाव शहरात आधीच चिंता वाढली होती. या व्यक्तीची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री पाहता तो एका खासगी वाहनाने आला होता. ज्या क्रुझर गाडीने आला,  त्यात नांदुरा शहरातिल १, तालुक्यातील  चांदुरबिस्वा येथील १ चालक व इतर सहा असे सात व  मलकापूर शहरातील एक व्यक्ती असल्याची माहिती समोर आली. मुळच्या चांदूरबिस्वा येथील काही लोकांनी पुण्यावरून गावाकडे येण्याकरिता एक क्रुझर गाडी केली होती. यामध्ये नांदुरा शहरातील एकाचा समावेश होता. मृतक व्यक्तीस वाघोली पुणे येथून लिफ्ट देऊन बसवून घेतले होते. नांदुरा  तालुक्यातील वडनेर भोलजी येथे उतरून ते  सर्व ७ व्यक्ती  आॅटोने चांदूरबिस्वा येथे पोहचले होते. व एक नांदुरा येथे उतरला तर मृतक जळगावपर्यंत पोहोचला होता. जळगाव प्रकरणात येथील मृत झालेल्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये संबधीत सात चांदुर बिस्वा येथील  व्यक्तींचे नाव आल्याने  व एक नांदुरा शहरातील असल्याने नांदुरा परिसरात  एकच खळबळ निर्माण झाली आहे. 

८ व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटीन १८ मेरोजी संध्याकाळी प्रशासनाला माहिती मिळताच चांदुरबिस्वा येथील संपर्कात आलेल्या ७ व्यक्तींना व नांदुरा शहरातील त्या एकाला बुलडाणा येते पाठवले आहे. या प्रकरणाने नांदुरा, मलकापूर, जळगाव व नांदुरा तालुक्याताल जबर धक्का बसला आहे. संबधितांचे रिपोर्ट काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान याबाबतची माहिती चांदुरबिस्वा ग्रामपंचायत प्रशासनाला होताच  त्यांनी गावात सर्वत्र सर्वेक्षण व गावाचा निजंर्तुकीकरणाच्या कामाला प्रारंभ केला आहे. एकाच क्रूझर गाडीत  चालकांसह नऊ  एवढे व्यक्ती कसे आले, त्यांना  कुणी परवाना दिला, या सर्वांसोबतच त्या वाहनचालकांचीही चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNanduraनांदूरा