शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

सहा महिन्यांनंतर प्रथमच खाद्यतेलाच्या दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 12:37 IST

Edible oil prices fall : शेंगदाणा तेल डब्याचा दर जवळपास २५० ते ३०० रुपयांनी उतरला आहे; पण पाऊचचे दर अजूनही जैसे थे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते; मात्र  सध्या तेल डब्यामागे घट झाली आहे. शेंगदाणा तेल डब्याचा दर जवळपास २५० ते ३०० रुपयांनी उतरला आहे; पण पाऊचचे दर अजूनही जैसे थे आहेत. त्याचबरोबर फळभाज्या महाग होत असून, कांदा अन् वाटाण्याला चांगला भाव मिळत आहे.आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. खाद्यतेल मार्केटमध्ये ग्राहकाकडून मागणी कमी आहे. त्यातच खाद्यतेलाची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे तेल डब्याचा दर कमी झाला आहे. सोयाबीन तेल डबा २३५० ते २४४० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर शेंगदाणा तेल डबा २३०० ते २४००, सूर्यफूल डबा २४५० ते २६०० आणि पामतेल डबा १९०० ते १९५० रुपयांपर्यंत मिळू लागला आहे. आंब्याची आवक कमी झाली आहे. त्याचबरोबर डाळिंब, संत्रा, पेरुची काही प्रमाणात आवक होत आहे; मात्र इतर फळांची आवक नाही. बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १४०० ते १६०० रुपये दर मिळाला, तर दोडक्याला १० किलोला ५०० ते ५५० रुपये, गवारला ५०० ते ६०० रुपये दर १० किलोला मिळाला. 

टॅग्स :khamgaonखामगावMarketबाजार