शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ई-क्लास, गायरान जमिनीवर घरकुल उभारणीस मिळणार परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:15 IST

चिखली : ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ई क्लास व गायरान जमिनीवर घरकुल बांधकामासाठी परवानगी मिळावी, ही मागणी आमदार राहुल बोंद्रे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पार पडलेल्या बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीत मागणी रेटून धरली असता, अतिक्रमीत जमिनीवर घरकुल बांधकामास परवानगी देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन तसा शासन आदेश लवकरच काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

ठळक मुद्देआढावा बैठकीत राहुल बोंद्रे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ई क्लास व गायरान जमिनीवर घरकुल बांधकामासाठी परवानगी मिळावी, ही मागणी आमदार राहुल बोंद्रे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पार पडलेल्या बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीत मागणी रेटून धरली असता, अतिक्रमीत जमिनीवर घरकुल बांधकामास परवानगी देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन तसा शासन आदेश लवकरच काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीत आ.राहुल बोंद्रे यांनी आपल्या मतदार संघातील विविध प्रश्नाकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले. यामध्ये लोकमतने घरकुलांबाबत प्रकाशित केलेल्या बातमीची दखल घेत जागेअभावी घरकुल उभारणीत येणार्‍या अडचणी मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिल्याने यातील अडचणी दूर करून अतिक्रमीत जागेवर घरकुलांचा लाभ देण्याबाबतचा अध्यादेश काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आ.बोंद्रे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शेतकर्‍याच्या नावे कर्ज पुनर्गठित असल्याने शासकीय मदतीपासून वंचित जिल्हय़ातील सन २0१६-१७ मध्ये ३२ शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या.  तर याच पद्धतीने पुनर्गठित कर्ज असलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाना पूर्वलक्षी प्रभावाने मदतीचे निकष लागू करण्याबाबतही तातडीने आदेश काढण्याचे तसेच मतदार संघातील पांढरदेव, घानमोड, मानमोड, या प्रकल्पग्रस्त गावातील जमीन अधिग्रहणप्रकरणी अर्थसंकल्पात रकमेच्या तरतुदीचे आश्‍वासन व चिखली औद्योगिक वसाहतीत टेक्सटाइल हब निर्मितीसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

शौचालयांसाठीचे अनुदानही मिळणार!त्याचबरोबर बुलडाणा जिल्हय़ामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ५८ हजार शौचालय बांधकामास मंजुरी मिळालेली आहे.; मात्र त्यासाठी लागणारा सुमारे ७0 कोटींचा निधी तातडीने दिला जावा, अशी मागणी आ.बोंद्रे यांनी या बैठकीत केली असता जिल्हय़ासाठी आवश्यक ते शौचालय बांधकाम अनुदान तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी दिले आहेत.