शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

दुबार पेरणीचे संकट टळले!

By admin | Updated: June 29, 2017 00:08 IST

दोन दिवस झाला जोरदार पाऊस : पेरणीची गती वाढली!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तसेच पावसाने खंड दिल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. लवकरच मृगाचा पाऊस बरसेल व त्याचा पिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अत्यंत वेगाने पेरण्या करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पावसाने आठ दिवस दडी दिली. त्यामुळे पिके सुकायला आली होती. आणखी काही दिवस पाऊस झाला नसता, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असती. मात्र, सोमवार व मंगळवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसाचा पिकांना चांगलाच फायदा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८० मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये घाटावर चांगला पाऊस झाला असून, घाटाखालील काही तालुक्यांमध्ये मात्र कमी पाऊस झाला आहे. मलकापूर तालुक्यात केवळ ९६ मिमी पाऊस झाला आहे, तर संग्रामपूर तालुक्यात ८५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत. मलकापूर तालुक्यात केवळ ८९४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे, तर संग्रामपूर तालुक्यात २४४८ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. घाटावरील बुलडाणा तालुक्यात २७५, चिखलीमध्ये २२३, जिल्ह्यात आतापर्यंत ५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वात जास्त पेरणी झाली असून, २ लाख २५ हजार ९९५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तुरीची पेरणी २८ हजार हेक्टरवर, तर मूग ९ हजार तसेच उडिदाची १२ हजार १३३ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी लवकर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे अधिक आहे. सोयाबीन सोबतच उडीद व मुगाची पेरणीही करण्यात येत आहे. कपाशीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. कर्जमाफीच्या लाभासाठी बँकेच्या चकरा शासनाने कर्जमाफीची घोषणा करून पंधरा दिवस झाले, तरी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या बँकेच्या चकरा मारत आहेत. अधिकारी अजूनही अध्यादेश आलाच नसल्याचे कारण सांगत आहेत.जिल्ह्यात झालेला पाऊस बुलडाणा : २७४चिखली : २२३ दे. राजा :१५५ सि. राजा : २०५लोणार : २२१मेहकर : २७६खामगाव : १२१.२शेगाव : १०२मलकापूर : ९६नांदुरा : २२८मोताळा : १८४ांग्रामपूर : ८५ज. जामोद : १६६