शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्व’पासून दुरावल्यानेच मनुष्याची जीवनात अधोगती! -  शकुंतला दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:43 IST

प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद... 

अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या अपेक्षा आणि इच्छा वाढल्यात. त्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात समाधान नाही. भौतिक सुख आणि स्पर्धांत्मक परिस्थितीमुळं मनुष्य स्वत:शीही वैरत्व पत्करत आहे. मात्र, अधात्मामुळे स्व:ची ओळख होते. तसेच अधात्म हेच सर्व विकार आणि वाईट गोष्टीपासून मुक्त करते.प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद... निकोप समाज निर्मितीसाठी काय करणे अपेक्षीत आहे? अपेक्षा आणि इच्छा वाढीस लागल्याने मनुष्य नैराश्य आणि तणावाकडे जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रेम...आदर आणि नि:स्वार्थ भावनेची देवाण-घेवाण केल्यास, निकोप समाजाची निर्मिती सहज शक्य आहे. आपल्या मते जगातील सर्वांत दु:खी व्यक्ती कोण?  मनुष्याला आपल्या जीवनात नानाविध दु:ख आहेत. आयुष्यभर वेगवेगळ्या दु:खामुळे मनुष्य व्यथीत राहतो. मनाच्या विपरीत घडलं की, साध्या साध्या गोष्टीने निराश होतो.  मनुष्याच्या आयुष्यात अनेक दु:ख असले तरी,  रिकामे ‘मन’असलेला व्यक्ती या जगात सर्वात दु:खी असल्याचे आपले प्रामाणिक मत आहे.सुख-समाधान प्राप्तीसाठी काय केलं पाहीजे? अंहकार मानवाचा सर्वातमोठा शत्रू आहे. शास्त्राने तर अंहकाराला दुराचारी कंसाची उपमा दिली आहे. सुख आणि समाधान प्राप्तीसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातील अंहकाररूपी कंसाला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहीजे. सर्व विकारांना शत्रु मानण्यात येते. आपल्या अंगी असलेले विविध विकार हे शत्रु असले तरी, जीवनात माणसाचा कुणीही शत्रु नसला पाहीजे. विकारांचा त्याग केल्या मनुष्य सुखी आहे.चिंता आणि चिता या दोन्हीत केवळ एका अनुस्वाराचा फरक आहे. मात्र, दोघांचेही कार्य समान आहे. चिंता ही माणसाला जीवंतपणी, तर चिता ही मेल्यावर जाळत असते. चिंतेमुळे दु:खाची तीव्रता कितीतरी पटीने वाढत जाते. म्हणून, माणसाने आपल्या आयुष्यात चिंतेला दोन हात लांबच ठेवावे.

 समाजातील वाढत्या कलहास जबाबदार कोण?सद्भावना आणि शिवभावना नाहीशी झाल्यामुळे समाजात कलह वाढीस लागले आहेत. क्षणिक स्वार्थ आणि भौतिक सुखासाठी मनुष्य हपापल्यानेच घरांघरांमध्ये गृहक्लेश वाढीस लागलेत. मनुष्य स्व:तपासूनच दूर गेला असून तो भरकटत आहे. आदर्श बाजूला ठेवल्यानेच समाजात अनेक वाईट घटना घडताहेत. ‘पूत कपूत होते है; माता कुमाता नाही होती!’ मात्र, सद्यस्थितीत  स्वत:च्या स्वार्थासाठी अनेक ठिकाणी आई मुलाच्या जीवावर उठल्याचेही दिसून येते. ही बाब समाजासाठी घातक ठरतेय!

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतkhamgaonखामगाव