परिसरातील शेतकरी हा निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती करत असल्यामुळे व परिसरामध्ये सिंचनाची दुसरी ठोस व्यवस्था नाही. या परिसरामध्ये कोरडवाहूची शेती केली जाते व त्याच नुसार पिकेसुद्धा घेतली जातात. यावर्षी पावसाने सुरुवातीला अचानक काही ठिकाणी हजेरी लावली तर काही ठिकाणी उघड दिली. या लहरीपणाच्या खेळांमुळे अनेक शेतकऱ्यांना महागडी बियाणे खरेदी करून दुबार व तिबार पेरणी करावी लागली. सिंदखेड राजा तालुक्यामधील बहुतांश ठिकाणी जुलै महिन्यात पेरणी झाली. कशीबशी पिके वाढत असताना पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतामध्ये पेरलेली पिके उन्हामुळे सुकू लागली आणि शेतकऱ्यांमध्ये याही वर्षी आपली पिके जातात की काय अशी भीती निर्माण झाली. परंतु १६ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आणि बळीराजा सुखावला. शेतामध्ये पीक डोलू लागली आहेत.
पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मिळाली संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:37 IST