शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी पाणीटंचाईचे चटके : प्रशासन ढिम्म!

By admin | Updated: May 26, 2017 01:25 IST

पाणीटंचाईमुळे मेहकर तालुक्यात दरवर्षी बळी जात आहे; मात्र संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा प्रयत्न गंभीरतेने घेतल्या जात नाही.

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उन्हाळ्यामध्ये दरवर्षी मेहकर तालुक्यात अनेक गावांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा कृती आराखडा दरवर्षी तयार करण्यात येतो; परंतु तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रत्यक्षात कामे होताना दिसत नाही. नियोजनाअभावी मेहकर तालुक्यात पाणीटंचाईचे भयानक चित्र निर्माण होत असून, पाणीटंचाईमुळे मेहकर तालुक्यात दरवर्षी बळी जात आहे; मात्र संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा प्रयत्न गंभीरतेने घेतल्या जात नाही.मेहकर तालुक्यात जवळपास १४० गावे येतात. त्यापैकी जवळपास ८० ते ८५ गावात पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येतो. या कृती आराखड्याला मंजुरात मिळाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी सुरु होते; परंतु प्रत्यक्षात पाणी टंचाईचे नियोजन बरोबर नसल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे भयानक चित्र निर्माण होत आहे, तर मागील वर्षी पाणीटंचाईमुळे एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर यावर्षीसुद्धा एका महिलेला पाण्यामुळेच आपला जीव गमवावा लागला. अशा बिकट परिस्थितीत संबंधित विभागाचे अधिकारी ज्या गावात घटना घडली त्या गावात जाऊन केवळ औपचारिकता पूर्ण करून कागदोपत्री पाणीटंचाई निवारण्याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवितात, तर वरिष्ठ अधिकारीसुद्धा कागदावरचा अहवाल पाहून घडत असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. अधिकाऱ्यांच्या या कागदी घोड्यांमध्ये मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब जनता भरडल्या जात आहे. पाणीटंचाईवर मेहकर तालुक्यात दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. पाणीटंचाईसाठी शासन लाखो रुपये देत असताना पाणीटंचाई निर्माण होते कशी, लाखो रुपये जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांच्या या वेळकाढू धोरणामुळे मात्र गरिबांचे दरवर्षी हाल होत आहेत.५९ गावात तीव्र पाणीटंचाईमेहकर तालुक्यात ५९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, ४९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत, तर ८ गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाणी टंचाईचे भयानक चित्र तालुक्यात पहायला मिळत असून, नियोजनाअभावी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.पाणी टंचाईचे दोन वर्षात दोन बळीमेहकर तालुक्यात दरवर्षी तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई निर्माण होत आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन उपाययोजना करण्यात येतात; मात्र स्थानिक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाईचे भयानक चित्र तयार होत आहे, तर याच पाणीटंचाईमुळे २०१६ मध्ये दादुलगव्हाण येथील महेश देवानंद शेजुळ या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पाणी भरताना विहिरीत पडून मृत्यू झाला होता, तर यावर्षी २०१७ मध्ये पार्डी येथील सावित्री सहदेव होगे या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे सतत दोन वर्षात पाणीटंचाईमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.कायम पाणीटंचाई निवारण योजना गायबगेल्या काही वर्षांपासून मेहकर तालुक्यात पाणीटंचाईची समस्या वाढतच आहे. त्यामुळे काही गावातील पाणी समस्या कायमची दूर करण्यासाठी अनेक गावांमध्ये महाजल, जलस्वराज राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांवर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला आहे; परंतु ज्या-ज्या गावात ही योजना राबविण्यात आली, त्या गावाची पाणी समस्या आज रोजी कायमच आहे. निकृष्ट व अर्धवट कामामुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे या योजनांची कामे करणारे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची चौकशी करुन कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.