शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

देयकाअभावी विकास आराखड्यातील कामे ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:02 IST

शासनाने ठेकेदाराचे कुठलेच बील काढले नाही. त्यामुळे ठेकेदाराने ४ जून २०१९ रोजी काम बंद केले.

- काशिनाथ मेहेत्रे  लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा: मातृतीर्थ विकास आराखड्यातील ४० टक्के कामे झाल्यानंतरही देयके निघत नसल्याने येथील विकासाची कामे चार महिन्यापासून बंद पडलेली आहेत. येथील ऐतिहासीक वास्तूची दुरवस्था झालेली असून, जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यापूर्वी राजवाडा सुशोभीत होणार का? असा उपस्थित होत आहे.मातृतीर्थ पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी आघाडी शासनाच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने ३११ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता. त्यानंतर युतीच्या कार्यकाळात पहीला हप्ता १२ कोटी ९६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. २० जुलै २०१८ रोजी ठेकेदाराला कायार्रंभ आदेश देण्यात आला. ठेकेदाराने युध्दपातळीवर कामाल सुरवात देखील केली.१९ जुलै २०१९ रोजी हे काम पूर्ण करावयाचे होते. मात्र शासनाने ठेकेदाराचे कुठलेच बील काढले नाही. त्यामुळे ठेकेदाराने ४ जून २०१९ रोजी काम बंद केले. त्यामुळे राजवाड्यात चोहीकडे दगडाचे ढीग पडले असून राजवाड्याची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे.तर राजवाड्या समोरील प्रांगणात नगर परिषदेने बगिचा व लॉनची व्यवस्था केली होती. त्याचीही दुरावस्था झाली आहे. १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सवा पूर्वी सुशोभीकरण न झाल्यास पर्यटकांचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. या विकास आराखड्यामध्ये निळकंठेश्वर महादेव मंदीर, रंगमहाल, काळाकोट, सावकार वाडा व लखोजीराव जाधव राजवाड्याचा समावेश आहे. ठेकेदाराने १५० कुशल कारागीरा मार्फत या कामाला सुरवात केली होती.निवडणूकी पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते या कामाचा उद्घाटन सोहळा सुध्दा पार पडला. ठेकेदाराने ४० टक्के काम पूर्ण केले मात्र त्यानंतर देयके न निघाल्याने हे काम बंद केले.पर्यटकांचा हिरमोडराजवाड्या समोरील प्रांगणात नगर परिषदेच्यावतीने बगिचा व हिरवळ करण्यात आली होती. मात्र नगर परिषद प्रशासनाचे हिरवळ नष्ट झाली आहे. बगिचाची सुध्दा दुरावस्था झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा