जळगाव जामोद (बुलडाणा) : नागपूर येथील कमळना परिसरात ९ मे २0१२ रोजी दगडाने ठेचून निर्दयीपणे झालेल्या तीन नाथजोगी समाजाच्या तरु णांच्या हत्या मोहीदेपूर येथील कुटुंबांना कायमच्या दु:खात टाकून गेल्या. अशा वंचितांच्या जीवनातही आनंदाचे क्षण फुलावे म्हणून तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दर दिवाळीला मोहीदेपूर येथील त्या विधवा बहिणी आणि त्यांच्या कुटुंबात भाऊबीज साजरी करण्याचा निश्चय केला. यावर्षी त्यांची बदली होऊन ते अकोला येथे उपविभागीय अधिकारी म्हणून गेले असले तरी त्यांनी या कुटुंबात येऊन दिलासा दिला.नागपूर हत्याकांडात पंजाबराव शिंदे, सुपडा नागनाथ आणि हसन सोळंके या तीन तरुणांची हत्या झाली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक पातळीवरून त्यांना सहानुभूती मिळाली. तत्कालीन जिल्हाधिकारी वाघ यांनी मोहीदेपूर गाव दत्तक घेतले, तर उ पविभागीय अधिकारी खडसे यांनी या तीन वंचित कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. त्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण, त्यांना घरकुले, तेथील पाण्याची समस्या, त्यांना राशनकार्ड तसेच दारिद्रय़रेषेखालील यादीत त्यांची नावे समाविष्ट करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, त्या विधवांना संजय गांधी निराधार योजनेमधून आर्थिक लाभ, दरमहा मानधन मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रत्यन केले. त्यानंतर त्यांची बदली झाली. परंतु २४ ऑक्टोबर रोजी प्रा. खडसे यांनी मोहीदेपुरात येऊन त्यांच्या प्रती असलेले ऋणानुबंध जपले व पंजाबची विधवा पत्नी सयाबाई, तीन मुली व कुटुंबातील अन्य सदस्यांना प्रत्येकी २ हजार रुपये साडी, चोळी, फराळ देऊन त्यांच्या दु:खावर फुंकर घातली.
मोहीदेपुरात वंचितांची दिवाळी
By admin | Updated: October 25, 2014 22:53 IST