शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वैरागड भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी, नाल्यांना पुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:46 IST

Heavy Rain in Khamgaon :  खामगाव तालुक्यातील वैरागड, चिंचपूर, गणेशपूर भागात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

खामगाव/चिंचपूर : चिंचपूर, गणेशपूर भागात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गणेशपूर येथील नाल्याच्या काठावर असलेल्या घर व हॉटेलमधील साहित्य वाहून गेले असून, गावात पाणी शिरले आहे. 

 खामगाव तालुक्यातील वैरागड, चिंचपूर, गणेशपूर भागात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरले. गणेशपूर येथे मस नदीकाठी घर असलेल्या परसराम तुळशीराम मेहेत्रे यांच्या घरातील संपूर्ण साहित्य वाहून गेले. तसेच अजाबराव कोकरे यांच्या हॉटेलमधील सिलिंडरसह अन्य साहित्य वाहून गेल्याची माहिती पोलिस पाटील मंगेश कोकरे यांनी दिली. मस नदीला आलेल्या पुरामुळे नदिच्या काठावर असलेली शेतातील माती वाहून गेली. गणेशपूर येथील शेषराव पवार, राम पोफळकर, चतकार, उन्हाळे, हबीब, अनंता गावंडे, बाळू गावंडे, शेख जावेद, संतोष पारसकर यांच्यासह इतरांच्या घराचे पुराने नुकसान झाले आहे. चिंचपूर गावालगत उंद्री रस्त्यावर असेलल्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहले. या पुलावर असलेल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच चिंचपूरच्या पाझर तलावात एक जेसीबी अडकली आहे.   

 

दोन तास बरसला धो- धो पाऊस

चिंचपूर, वैरागड भागात तब्बल दोन तास ढगफुटीसारखा पाऊस झाल्याचे नागरिकांनी सांगितले. ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत या भागात जोरदार पाऊस झाला.

टॅग्स :khamgaonखामगावRainपाऊस