खामगाव (बुलडाणा) : रस्त्यावर उभे असलेली वाळलेली झाडे कोणत्याही क्षणी वाहनधारक वा पादचार्यासाठी धोकादायक ठरू पाहत आहे. मुख्य रस्त्यावरील ही झाडे वेळप्रसंगी नागरीकांच्या जिवीत्वास हानी पोहचविण्याची शक्यता असताना याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.खामगाव-अकोला रोडवर मन प्रकल्पानजीक राष्ट्रीय महामार्गावर निंबाचे मोठे झाड पुर्णत: वाळलेले आहे. या मार्गावरून सतत वाहतुकीची वर्दळ असते. कित्येक दिवसापासून हे झाड वाळलेल्या स्थितीत उभे असताना ते केव्हाही खाली जमीनीवर कोसळू शकते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाजवळचे निंबाचे मोठे झाड वाळलेल्या अवस्थेत उभे आहे. या मार्गावरून वाहनधारक व पादचार्यांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ आहे. मात्र तरीही हे झाड संबंधित विभागाच्या नजरेस पडू नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. खामगाव-नांदुरा रोडवरील सुटाळा गावातच रस्त्यावर कित्येक दिवसापासून आहे त्या वाळलेल्या स्थितीत उभे आहे. झाडा शेजारी छोटी मोठी दुकाने आहेत तर या रस्त्यावरून नागरीकांची नेहमीच ये-जा सुरू राहते. मात्र तरीही ही झाडे तोडण्यास कुणीही समोर आल्याचे दिसत नाही.
वाळलेली झाडे धोकादायक
By admin | Updated: November 30, 2014 23:13 IST