शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

घाटावर दुष्काळाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 20:05 IST

बुलडाणा : घाटावरील सर्वच तालुक्यामध्ये मागिल अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पिक सुकायला लागले आहे. तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी घाटावरील तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून याबाबत शासनाने सर्वे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनामधून वाढत आहे.

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करण्याची  वाढली मागणी पावसाअभावी पिकांची स्थिती बिकट

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : घाटावरील सर्वच तालुक्यामध्ये मागिल अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पिक सुकायला लागले आहे. तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी घाटावरील तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून याबाबत शासनाने सर्वे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनामधून वाढत आहे.जिल्ह्यात पेरणीच्या सुरूवातीलाच चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात ७ लाख ४८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात आली. सुरूवातीला झालेल्या पावसावर आतापर्यंत पिके तग धरून होती. मात्र सध्या  पावसाने पाठ फिरवल्याने घाटावरील पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाअभावी घाटावरील बुलडाणा, चिखली, मोताळा, लोणार, सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा या तालुक्यांमधील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात सापडली आहेत. पावसाची ही उघडीप दुष्काळाचे सावट निर्माण करत आहे.   पाऊस लांबल्याने पिकांवर परिणाम झाला असून, सोयाबीनने माना टाकल्या आहेत. तर कपाशीची पिकांचीही वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी टँकरने पाणी पुरवत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.  पाऊस येत नसल्याने  शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. त्यामुळे पिकांची परिस्थिती पाहता, जिल्ह्यात पिकांचा सर्वेकरून दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शेतकºयांकडून जोर धरत आहे.