शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दुष्काळी परिस्थितीतही २ एकरात घेतली ४०० क्विंटल हळद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:49 IST

वरवट बकाल: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकऱ्याने २ एकरात तब्बल ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकऱ्याने २ एकरात तब्बल ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. दुष्काळी परिस्थितीतही भरघोस उत्पादन झाल्याने याची तालुकाभरात चर्चा होत आहे.संग्रामपूर तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असून, या भागातील शेतकरी कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडीद, मुग ही पारंपरिक पिके घेतात. अलीकडच्या काळात शेती परवडत नसल्याने काही शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. असाच एक प्रयोग महादेव डाबरे यांनी केला. त्यांनी २ एकरात ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेत पारंपरिक पिकांना एक सशक्त पर्याय शोधला आहे.पारंपरिक पीक पध्दतीतून पाहिजे तसे उत्पन्न होताना दिसत नाही. अलीकडे पाऊस पाठ फिरवत असल्याने शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे; परंतु तालुका मुख्यालयापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवट बकाल येथील शेतकरी महादेव डाबरे यांनी विविध प्रयोग करणे सुरू केले. त्यांना २०१० मध्ये राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारही मिळाला आहे. वडीलोपार्जीत शेतजमिनीत स्वत:च्या कल्पकतेतून दरवर्षी नवनवीन प्रयोग ते करतात. शेती सुपीक होजास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याकडे त्यांचा कल राहतो. (वार्ताहर)-पाण्याचा प्रश्न सोडविला !तालुक्यात अनेक शेतकरी प्रचंड मेहनत घेतात, परंतु त्यांना सर्वात मोठी अडचण येते ती पाण्याची. दिवसेंदिवस पाऊस कमी होत असल्याने विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. त्यामुळे उत्पादन घेणे शक्य होत नाही. पाण्याचा हा प्रश्न डाबरे यांच्या समोरही होताच. परंतु त्यांनी शेताभोवती जलसंधारणाची कामे केली. स्व:खर्चातून त्यांनी पाणी अडविले. नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरणासारखे प्रयत्न त्यांनी केले. याचेच फलीत म्हणून त्यांच्या शेतातील विहिर, बोअरवेलला पाणी आहे. याच भरवश्यावर ते शेतीत नवनवील प्रयोग करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती