साखरखेर्डा (जि. बुलडाणा), दि. ४ - साखरखेर्डा ते जवळा रोडवर खामगाव-जालना बस जालना येथे जात असताना चालकाला अचानक चक्कर आल्याने रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. या अपघातात एक महिला जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.खामगाव ते जालना एम. एच. ४0 - ५४४६ क्रमांकाची बस साखरखेर्डा येथे येत असताना चालक शेषराव नाथाजी वाकोडे यांचा रक्तदाब कमी झाला. त्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली. यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखत बस उभी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटी झाली.बसमध्ये एकूण ४२ प्रवासी प्रवास करीत होते. यापैकी उषाताई गवई ही महिला जखमी झाली. शेषराव वाकोडे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
चालकाला चक्कर आल्याने बस उलटली!
By admin | Updated: August 5, 2016 00:24 IST