शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

ट्रकखाली मिनीडोअर दबून मुलीसह चालक ठार, राष्ट्रीय महामार्गावर सलग 12व्या दिवशी अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 20:08 IST

भरधाव ट्रकमधील वजनदार प्लेट पडून त्याखाली मिनीडोअर दबल्याने घडलेल्या अपघातात मिनीडोअर चालकासह १४ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला.

मलकापूर : भरधाव ट्रकमधील वजनदार प्लेट पडून त्याखाली मिनीडोअर दबल्याने घडलेल्या अपघातात मिनीडोअर चालकासह १४ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ तांदुलवाडी पुलाजवळील अलीकडच्या वळणावर आज सोमवारी ४.४५ वाजेच्या सुमाराला घडली. त्यात चार जण गंभीररित्या जखमी असून तीन चिमुकल्यांना जखमा झाल्या आहेत.यासंदर्भात मिनीडोअर प्रवासी घेऊन चिखली रणथमकडे निघाली होती. विरुद्ध दिशेने भरधाव ट्रक (क्र.जिजे २७-बीटी ८३११) समोरून भरधाव स्पीड बघून मिनीडोअर अलीकडच्या वळणावर त्या ट्रकची भरधाव स्पीड बघून मिनीडोअर चालकाने त्याची गाडी जागीच थांबविली. तेवढ्यात ट्रकमधील मागच्या बाजूने असलेल्या वजनदार प्लेट मिनीडोअरवर पडल्याने सदरची गाडी अक्षरश: दबली. चालक विनोद श्रीधर जगताप (वय ५०) रा. राधाकृष्ण सोसायटी जागीच ठार झाले तर त्यांच्या शेजारी बसलेली पिंकी वासुदेव वानखेडे (वय १४, रा.घोडसगाव चिखली) ही मुलगी डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाली. मनकर्णाबाई लक्ष्मण झनके (वय ४८, रा. रणथम), शोभा संजय खेडकर (वय ३८, रा.गारडगाव ता. खामगाव), दिलीप तुकाराम वानखेडे (वय ४०, रा.चिखली), गजानन दिनकर कांडेलकर (वय २७, रा. दुधलगाव) असे चार जण गंभीररीत्या जखमी झाले.दरम्यान एमआयडीसी पोलीस व महामार्ग पोलिसांनी जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलविले. अपघातानंतर पोबारा केलेल्या ट्रकचा सरपंच बाळू पाटील, पोहेकाँ संजय निंबोळकर, पोकाँ आनंद माने यांनी पाठलाग केला व मुंधडा पेट्रोल पंपानजीक त्याला पकडले आहे.