शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बस पत्रा अपघातप्रकरणी चालक व वाहक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 05:46 IST

मुंबई कार्यालयाला देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलढाणा/मुंबई : मलकापूर आगाराच्या धावत्या बसचा पत्रा लागून दोघांचे हात कापले जाणे व एकास गंभीर इजा होण्याच्या प्रकरणात आता एसटी महामंडळातर्फे नागपूर नियंत्रण समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत असून या प्रकरणात संबंधित बस चालक व वाहकास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. प्रादेशिक व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी होत आहे. सविस्तर अहवाल मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.

मलकापूर आगाराच्या बसच्या टुलबॉक्सचा पत्रा बाहेर निघून शुक्रवारी सकाळी गणेश शंकर पवार याच्या हाताला जबर मार लागला. सोबतच विकास गजानन पांडे व परमेश्वर आनंदा सुरडकर या दोघांचे हात उखडले गेले. यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. घटनास्थळी समिती सदस्यांसह जळगाव खान्देशचे विभाग नियंत्रण, बुलढाण्याचे डीटीओ, यंत्र अभियंता, डेप्युटी मॅकेनिकल इंजिनियरसह काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

सीसीटीव्ही फुटेजही तपासलेअपघातग्रस्त बसचे गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशी समितीने तपासले आहे. सोबतच घटनेच्या आदल्या दिवशी ही बस आगारात परत आल्यानंतरच्या फुटेजचीही तपासणी करण्यात आली. मात्र, दुर्घटनेचे काही फुटेज मिळते का, याचीही तपासणी समिती करत आहे.‘त्या’ तरुणांना नोकरी द्या

बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या एसटीच्या अपघातामध्ये हात गमावलेल्या दोन व्यक्तींना नोकरी तसेच योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  तांबे यांनी म्हटले आहे की, एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवितासोबतच रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा घटना चिंताजनक आहेत. या दोन्ही नागरिकांची कोणतीही चूक नसताना त्यांना आपला हात गमवावा लागला. जायबंदी झालेल्या या दोन्ही व्यक्तींना नोकरी व नुकसानभरपाई मिळावी.

टॅग्स :Bus Driverबसचालकbuldhanaबुलडाणा