शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

ठिबक सिंचन घोटाळा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी अधिकाऱ्याला ठिबक संच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:28 IST

१९ डिसेंबररोजी कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांना ठिबक संच भेट देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेतील घोटाळ््याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. १९ डिसेंबररोजी कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांना ठिबक संच भेट देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. आठवडाभरात चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. राज्यात सर्वत्रच राज्य शासनामार्फत प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना  राबविण्यात आली. बुलडाणा जिल्हयात यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी व ठिंबक संच विक्रेत्यांनी २०१२ ते २०१८ या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून शासनाची दिशाभूल केली आहे. शेतकºयांचे आर्थीक उत्पन्न वाढावे यासाठी ठिबक सिंचन योजना राबवण्यात येत आहे. मात्र या योजनेचा खरा आर्थिक फायदा श्रीमंत शेतकºयांसह जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कर्मचारी, परवाना धारक ठिबक सिंचन संच विक्रेते यांनीच घेतला. खºया पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले. जिल्ह्यातील तेराही तालुक्यात अनेक ठिकाणी बनावट लाभार्थी दाखवून योजनेचा लाभ लाटला. फोटोशिवाय अनेक प्रस्तावांना मंजूरात देण्यात आली. बनावट शेतकरी लाभार्थी हाताशी धरून शासनाची दिशाभूल केली. शासनाच्या अटी शर्थीचे उल्लंघन करीत आॅनलाईन व आॅफलाईन असे दोनदा तिनदा लाभ अनेकांना मिळवून दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून भ्रष्ट कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच ठिबक सिंचन विक्रेत्यांवर १० दिवसाच्या आत फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शासनाच्या निधीवर मलिदा लाटण्याचा प्रयत्न करणाºया भ्रष्ट अधिकाºयांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रशांत डिक्कर यांनी सांगितले असून कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी हितासाठी लोकशाही मार्गाने जिल्हाभर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.  

‘स्वाभिमानी’ने दिला कारवाईसाठी आठवड्याचा अल्टीमेटमठिबक सिंचन घोटाळ््याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी जाब विचारणार असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सांगितले होते. मात्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक हे १९ डिसेंबररोजी जाणिवपूर्वक कार्यालयात अनुपस्थित राहिले. जिल्हयातील ठिबक सिंचन घोटाळ््याबाबत कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, जळगाव जामोद विधानसभा संपर्क प्रमुख मोहन पाटील यांनी चर्चा केली. यावेळी रोशन देशमुख, राणा चंदन, कार्तीक खेडेकर, पवनकुमार देशमुख, रफिक शेख करिम, लवेश उबरहांडे, दत्ता जेऊघाले, ज्ञानेश्वर कल्याणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकर