शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनभेद निर्माण होऊ देवू नका, स्वत:मधील सुजान नागरिक जागा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 16:22 IST

आपण देशाचे सुजान नागरिक आहोत. याची जाणिव असू द्यावी, असे भावनिक आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  सद्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून शांतता भंग होण्याचे प्रसंग घडत आहेत. या कायद्याचे समर्थन आणि विरोध करताना सर्वप्रथम आपण देशाचे सुजान नागरिक आहोत. याची जाणिव असू द्यावी, असे भावनिक आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी येथे केले.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सोमवारी रात्री झालेल्या या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जिल्हा पोलिस अधिक्षक पाटील म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात, राज्यात आणि आपल्या परिसरात काही ठिकाणी शांतता भंग पावण्याचे प्रकार घडत आहेत. तात्विक विरोध करताना आपल्याच देशाच्या संपत्तीचे नुकसान करणे, योग्य नाही. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराने पारीत केलेल्या कायद्याला रस्त्यावर उतरून विरोध करणे चुकीचे आहे. विरोधासाठी अनेक कायदेशीर मार्ग आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल, असे कृत्य कुणीही करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एखाद्या कायद्याच्या बाजूने अथवा विरोधात मतभेद असू शकतात. मात्र, यासाठी मनभेद होईल अशी कुणाचीही वागणूक असू नये, असे ते म्हणाले.संचालन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी केले. आभार शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी मानले. या सभेला शहरातील शांतता कमेटी सदस्य विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.    

सामाजिक सलोखा अबाधित ठेवा: मौलाना युनुसभारत आमचा देश आहे. भारताच्या पावन भूमीतच आमचा जन्म झाला आहे. भारताची माती आमच्यासाठी पवित्र आहे. त्यामुळे सामाजिक सलोख्याला ठेच पोहोचेल,  असे कृत्य कुणीही करू नये आवाहन जुना फैल मशीदीचे मौलाना युनुस यांनी केले. यावेळी हकीमोद्दीन बोहरा, मौलाना इमरान खान, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, प्रशांत देशमुख, अमोल अंधारे यांचीही समायोचित भाषणे झालीत. सर्वांनीचं शांततेचे आवाहन केले.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक