शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

निर्बंध संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 12:11 IST

Buldhana News : कठोर निर्बंध येत्या काळात प्रसंगी संपतील, मात्र अशा स्थितीतही मुलांना घराबाहेर न सोडणेच बरं, अशी भावना व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता राज्यस्तरीय टास्क फोर्स, आयसीएमआर व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहे. जिल्ह्यात लावण्यात आलेले कठोर निर्बंध येत्या काळात प्रसंगी संपतील, मात्र अशा स्थितीतही मुलांना घराबाहेर न सोडणेच बरं, अशी भावना व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनानेही तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता विचारात घेता पूर्वतयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने बुलडाणा कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये एक स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून, तो थेट ऑक्सिजन जनरेशन प्लांटशी जोडण्यात आला आहे. जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची संख्या नेमकी किती हे स्पष्ट नसले तरी बुलडाणा शहरातील बालरोगतज्ज्ञांच्या रुग्णालयात जवळपास ३० लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे निदर्शनास आल्याचे स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने आता खासगी रुग्णालयांतील डॉक्टर मिळून एक स्वतंत्र कोविड कक्ष लहान मुलांच्या इलाजासाठी उभारण्याच्या तयारीत आहे. बालरोगतज्ज्ञांना व्हॉट्सॲप ग्रुपवरही त्याबाबत सध्या चर्चा होत आहे. मोठ्या माणसाची कोरोनाची ट्रीटमेंट व लहान मुलांची ट्रीटमेंट यात बराच फरक आहे. त्या दृष्टीनेही बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेकडून काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असल्याची माहिती आहे.

लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे काय?लहान मुलांमध्येही मोठ्या माणसाप्रमाणे तीव्र ताप येतो. डोके दुखणे, खोकला, पडसे येणे. कधी कधी संडास लागणे, वांती होणे, मळमळ होणे अशी लक्षणे असतात.क्वचित प्रसंगी लहान मुलांची प्रकृती गुंतागुंतीचे होते. लहान मुलांना कोरोना होण्याचे कारण प्रसंगी कुटुंबाला कोरोना झाल्याचा इतिहास असणेही असते. लहान मुलांमध्येही साधारण, मध्यम व प्रसंगी मॉडरेट लक्षणे आढळून येतात. त्यानुसार ट्रीटमेंटमध्ये बदल केला जातो.

ताप येणे, डोके, पोट दुखणे क्वचित प्रसंगी संडास लागणे, मळमळ होणे, वांती होणे अशी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. लहान मुलांची कोरोना चाचणीही पालकांनी न घाबरता करावी. ती त्रासदायक नसते. - डॉ. राजेंद्र बेदमुथा, बालरोगतज्ज्ञ, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या