शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

वात्सल्य हरवलेल्या चिमुकल्याच्या रडण्याने डॉक्टरांचेही काळीज गहीवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 11:06 IST

आईचा आवाज ऐकण्यासाठी कासावीस झालेल्या या चिमुकल्याला बघून अख्खे सामान्य रुग्णालय गहीवरले.

- नीलेश जोशीबुलडाणा: दोन महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात आजारी असलेल्या आईची सेवा करणारा चार वर्षाचा चिमुकला दहा जुलै रोजी तिच्या जाण्याने पोरका झाला आहे. अवघ्या चार वर्षाच्या वयात मोठी समज आलेल्या या चिमुकल्याला आईस घास भरवत असतानाच ती गेल्याचे समजले आणि तिच्या पार्थिवावर हंबरडा फोडून आईचा आवाज ऐकण्यासाठी कासावीस झालेल्या या चिमुकल्याला बघून अख्खे सामान्य रुग्णालय गहीवरले.मन हेलावून सोडणारी ही घटना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा जुलै रोजी घडली व समाजासमोर अनेक प्रश्न उपस्थित करून गेली आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी एका व्यक्तीने या महिलेस बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हा तिच्या सोबत चार वर्षाचा हा चिमुकला आणि तिच्या गर्भात वाढणारे एक बाळही होते. नियतीला कदाचीत या महिलेचे जगणे मान्य नसेल, पण गर्भातील त्या बाळाचाही जन्मानंतर अवघ्या काही दिवसात मृत्यू झाला. त्यामुळे आयुष्याचे कदाचीत गणीत चुकलेल्या त्या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यातच प्रसुतीनंतर या महिलेच्या शरीरातील रक्तही कमी झाले. त्यामुळे आजारातून उठण्या ऐवजी ती अधिकच खालावली.मात्र त्या काळात तिची जगण्याची उमेद होती अवघा चार वर्षाचा तिची सेवा करणारा चिमुकला. अगदी एखाद्या सज्ञान व्यक्तीप्रमाणे आजारी असलेल्या त्याच्या आईची सेवा या चिमुकल्याने केली. दररोज जेवताना पहिला घास त्याने आईला भरवला. त्यानंतरच तो जेवला. मात्र आईचे वात्सल्य नियतीने त्याच्याकडून हिरावले. दहा जुलै रोजी सैलानी येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणलेल्या या महिलेचा मृत्यू झाला. तेव्हा या चार वर्षाच्या चिमुकल्याने फोडलेला टाहो वार्डात उपस्थित असलेल्या रुग्णांसह डॉक्टरांचे काळीज हेलावून गेला. रुग्णालयातील कर्मचारी सुहास गुर्जर याला तर हा प्रसंग सांगताना अश्रूही अणावर झाले. गेल्या दोन महिन्यापासून रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारीच या चिमुकल्याला सहकार्य करत होते.मात्र आईची सेवा केल्यानंतरही ती गतप्राण झाल्यानंतर चिमुकल्याने फोडलेला टाहो पाहता असा प्रसंग पुन्हा कुणावरही येवू नये.

माणुसकी धावलीमहिलेच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यविधीचाही प्रश्न समोर आला. तेव्हा रुग्णालयातीलच कर्मचारी व डॉक्टरांनी एकत्र येत या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचे रुग्णालयातील डॉक्टर विजय सोळंकी यांनी सांगितले. सध्या या चार वर्षाच्या चिमुकल्याचे संगोपन रुग्णालयातील हेच कर्मचारी करत आहे. मात्र या चार वर्षाच्या चिमुकल्याचे भविष्य मात्र तुर्तास तरी अधांतरी आहे. आईच्या पार्थिवाला बिलगून रडणाºया त्या चिमुकल्याचा ह्रदय हेलावून सोडणारा हंबरडा रुग्णालयातील  अनेकांच्या डोळ््यात अश्रू आणून गेला.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल