शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

डॉक्टर संपावर; रुग्ण वा-यावर

By admin | Updated: March 24, 2017 01:43 IST

आयएमएकडून कारवाईची मागणी; बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजार डॉक्टर संपात सहभागी

बुलडाणा, दि.२३- मागील काही महिन्यांपासून डॉक्टरांना मारहाण होत असल्याच्या घटना राज्यभरात घडल्या. यावर निर्बंध घालण्याकरिता शासनाकडे वारंवार निवेदन देण्यात आले; मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांनीही बुधवारी सायंकाळपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संपात बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजार डॉक्टर सहभागी झाल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. आपल्या विविध मागण्यांबाबत आयएमएच्या बुलडाणा शाखेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व अपर जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन दिले. निवेदनानुसार, डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातील कायद्याचे पालन झाले पाहिजे, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे; मात्र सरकार त्याबाबत गंभीर नाही. रुग्णाच्या नातेवाइकांकडून बर्‍याच वेळा क्षुल्लक कारणातून डॉक्टरांना मारहाण करण्यात येते, त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी, जोपर्यंत उपाययोजना होत नाही, तोपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर ओपीडी बंद ठेवणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.दोन हजार डॉक्टर सहभागीइंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयातील दोन हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. यात निमा, हॉमिओपॅथी, युनानी, डेंटल असोसिएशनच्या डॉक्टरांचा सहभाग आहे.सर्व हॉस्पिटलमधील ओपीडी व रुडींग ऑपरेशन वगळता, अतिआवश्यक वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळणार आहे. संघटना डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीच्या विरोधात आहोत. मारहाणीचा आम्हीही निषेध करीत आहोत. याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय द्यावा.- डॉ.जी.बी.राठोड, जिल्हाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, बुलडाणा