शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका - रायमुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:50 IST

तीन ते चार वर्षांपासून ग्राहकांची कामे प्रलंबित  राहणे ही  गंभीर बाब आहे. चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करू, मात्र चुकी च्या  कामासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश  शिवसेना आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले. 

ठळक मुद्देजनता दरबारात जनतेचा रोषअधिकार्‍यांची उडाली धांदल

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शिवसेनेच्यावतीने १0 नोव्हेंबर रोजी वीज वितरण कंपनी संदर्भा त आयोजित  जनता दरबारात जनतेने वीज कंपनी विरोधात आपला रोष  व्यक्त केला. तीन ते चार वर्षांपासून ग्राहकांची कामे प्रलंबित  राहणे ही  गंभीर बाब आहे. चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करू, मात्र चुकी च्या  कामासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश  शिवसेना आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले. स्थानिक वीज वितरण कार्यालयात १0 नोव्हेंबर रोजी ग्राहकांसाठी जनता  दरबार आयोजित केला होता. यावेळी आ. रायमुलकर बोलत होते. या  जनता दरबाराला खा. प्रतापराव जाधव, कार्यकारी अभियंता पी. यु.  जायभाये, सभापती माधवराव जाधव, सभापती जया कैलास खंडारे, उ प-सभापती बबनराव तुपे, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, उप- सभापती राजू घनवट, उप-तालुकाप्रमुख समाधान साबळे, रामेश्‍वर बोरे,  केशवराव  खुरद, संजय धांडे, सुरेश काळे, मदन चनखोरे, मोतीचंद  राठोड, भुजंग म्हस्के, रमेश देशमुख आदी हजर होते.  जनता दरबारात सर्वप्रथम दृगबोरी येथील यशवंता डाखोरे व ८ शे तकर्‍यांनी तक्रारी केल्या. यामध्ये विद्युत कनेक्शनसाठी ३0 मे २0१४ ला  कंपनीकडे पैसे भरले आहेत; परंतु अद्यापही वीज कनेक्शन मिळाले नाही. आरेगाव येथील गावकरी  विद्युत रोहित्राची मागणी करून थकले असून,  गावकर्‍यांनी आतापर्यंत १२ हजार रुपये खर्च केले; मात्र रोहित्र मिळाले  नाही, अशी तक्रार सरपंच संजय धांडे व गावकर्‍यांनी मांडली. कृ.उ.बा.  समिती संचालक केशवराव खुरद म्हणाले की, भोसा येथील विद्युत जनित्र   फेल झाल्यानंतर नवीन अद्याप जोडले नाही. या बाबतीत कंत्राटदार नंदन  देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पारखेड ये थील सरपंच मोतीचंद राठोड यांनी आपली तक्रार मांडताना पाच वर्षां पासून सिंगल फेजसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र काम होत नाही, यावर खा. प्रतापराव जाधव यांनी अभियंत्यांना  धारेवर धरुन मेंटनंस एजन्सीबाबत उद्या ऑर्डर काढा, असे कार्यकारी  अभियंता पी.यू. जायभाये यांना निर्देश दिले, तर कंत्राटदार पैसे मागतात,  त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. या दरबारात  मोळा, माळीपेठ, उसरण, कोयाळी सास्ते, रायपूर, साब्रा, ब्रम्हपुरी, शहा पूर, देउळगावमाळी गावचे विविध प्रश्नही सोडविण्यात आले. उप- कार्यकारी अभियंता प्रशांत कलोरे यांच्या कार्यपद्धतीवरही यावेळी नाराजी  व्यक्त करण्यात आली. संचालन अभियंता मधुकर बुगदाणे तर आभार सं तोष डोमळे यांनी मानले.

टॅग्स :Sanjay Raymulkarसंजय रायमुलकर