शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग समाधानने कळसूबाई शिखरावर फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:40 IST

Kalsubai Peak दिव्यांग असलेल्या समाधान बंगाळे या २४ वर्षीय युवकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई  शिखर सर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील  दिव्यांग असलेल्या एका २४ वर्षीय युवकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई  शिखर सर केले. आपल्या अंगी असलेल्या जिद्दीने त्याने  शिखरावर समाधानाचा  तिरंगा फडकविला आहे. राज्यातील १९ युवकांनी शिखर सर करण्यासाठी प्रयत्न केले. यात बुलडाणा जिल्ह्यातील समाधान बंगाळे या युवकाचा समावेश होता.बुलडाणा जिल्ह्यातील शिंदी येथील समाधान बंगाळे हा एका पायाने दिव्यांग आहे. शिव ऊर्जा   प्रतिष्ठान औरंगाबाद  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी संस्थेच्या वतीने  दिव्यांगासाठी ही मोहीम आयोजित केली होती. गाडे हे स्वतः दिव्यांग असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी झटत आहेत. दिव्यांग कल्याण संघटनेत समाधान बंगाळे हा काम करीत असल्याने आपणही कळसूबाई शिखर पार करू शकतो, अशी जिद्द मनाशी बाळगून त्याने शिवाजी गाडे यांच्याशी संपर्क साधला.  या मोहिमेत जिल्ह्यातून एकमेव  समाधान बंगाळे हा दिव्यांग तरुण सहभागी झाला. २६ जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण सुरू असताना इकडे महाराष्ट्रातील १९ अपंग हातात तिरंगा घेऊन गड सर करीत होते. याबद्दल समाधान बंगाळे याला प्रशस्तिपत्र व गोल्ड मेडल देऊन संस्थेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTrekkingट्रेकिंगSindkhed Rajaसिंदखेड राजा