शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी घटस्फोट रोखणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:10 IST

खामगाव: आजच्या आधुनिक काळात भौतिकवादामुळे  कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ पाहत आहे. त्यामुळे कुटुंब  व्यवस्था  टिकविण्यासाठी समाजातील घटस्फोट रोखण्याचा  प्रयत्न क्षत्रिय राजपूत सेवा मंडळ करणार आहे. 

ठळक मुद्देविवाहप्रसंगी देणार घटस्फोट न घेण्याची शपथव्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्न

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आजच्या आधुनिक काळात भौतिकवादामुळे  कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ पाहत आहे. त्यामुळे कुटुंब  व्यवस्था  टिकविण्यासाठी समाजातील घटस्फोट रोखण्याचा  प्रयत्न क्षत्रिय राजपूत सेवा मंडळ करणार आहे. जुन्या काळातील पारंपरिक चालीरीती व संस्कार लोप पावत  चालल्याने याचे परिणाम समाजजीवनावर होऊ लागले आहे त. समाजापेक्षा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार बळावल्याने व  त्याग आणि सहनशीलतेपेक्षा भौतिक सुखाला महत्त्व प्राप्त  झाल्याने कुटुंबव्यवस्थेला तडा जात आहे. कुटुंब विभक्त  होण्याचे प्रमाण जसे वाढले तसेच घटस्फोटांचे प्रमाणही  वाढले आहे. त्यामुळे भारतीय कुटुंबव्यवस्था पूर्णपणे  कोलमडून तर पडणार नाही ना, अशी भीती व्यक्त होऊ  लागली आहे. याचा विपरीत परिणाम भावी पिढीवर होऊ  शकतो. याकरिता क्षत्रिय राजपूत सेवा मंडळाने पुढाकार  घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील  यांनी दिलेल्या माहितीनुसार वाढते घटस्फोट हे  समाजजीवनाच्या दृष्टीने चिंताजनक असून, याकरिता बदल ती जीवनशैली, व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या चुकीच्या संकल्पना,  व्यसने, पाश्‍चात्य संस्कृतीचा युवा मनावरील पगडा, अशी  वेगवेगळी कारणे आहेत. त्यामुळे भारतीय कुटुंब व्यवस्थेला  मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही स्त्री व पुरुषाचा  विवाह हा फक्त दोन मनांना जोडणारा नसतो. घटस्फोट  रोखले जाणे काळाची गरज बनली असून, यासाठी पुढाकार  घेण्याचा निर्णय राजपूत सेवा मंडळाने घेतला आहे.

विवाहप्रसंगी देणार घटस्फोट न घेण्याची शपथसदर उपक्रमांतर्गत क्षत्रिय राजपूत सेवा मंडळाकडून समाजा तील जोडप्यांना विवाहप्रसंगीच प्रापंचिक जीवनात  एकमेकांशी जुळवून घेण्याचे वचन घेऊन घटस्फोट न  घेण्याची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे विवाहबंधन हे  आयुष्यभरासाठी असल्याचे नवविवाहित जोडप्याच्या मनावर  बिंबवले जाईल. यातून घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्याचा  प्रयत्न मंडळ करणार आहे.

व्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्नव्यसनाधीनतेमुळे संसार मोडण्याचे प्रमाण वाढत आहे.  अनेक तरुण दारू व इतर व्यसनांमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष कर तात. त्यामुळे त्यांचे घटस्फोट होतात. यास्तव तरुणांना  व्यसनांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न क्षत्रिय राजपूत सेवा  मंडळ करणार आहे. केंद्रांची मदत घेऊन व्यसने  सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.