शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नटराज गार्डन अनियमितता प्रकरणी विभागीय उपायुक्तांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 10:57 IST

Khamgaon News : उपायुक्त संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात एक त्रिसद्स्यीय पथक मंगळवारी सकाळीच खामगाव पालिकेत धडकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नटराज गार्डन बांधकामात अनियमिततता झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंगळवारी स्थळ निरिक्षण करण्यात आले. यासाठी उपायुक्त संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात एक त्रिसद्स्यीय पथक मंगळवारी सकाळीच खामगाव पालिकेत धडकले होते. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली होती.नटराज गार्डन प्रकरणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही राजकीय तक्रारींचाही समावेश आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते भिकुलाल जैन, नंदलाल भट्टड, महेश देशमुख आणि नगरसेवक अब्दुल रशीद आदींच्या तक्रारींचा समावेश आहे. प्रारंभी मुख्याधिकाऱ्यानी स्थळ निरिक्षण केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही चौकशी झाली होती. , समाधानकारक चौकशीचा मुद्दा उपस्थित करीत तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे  केली होदती. त्यासंदर्भाने अमरावती येथील उपायुक्त संतोष खांडेकर (नगर पालिका प्रशासन) यांच्या नेतृत्वात त्रिसद्स्यीय पथकाने सविस्तर चौकशी केली. यावेळी काही मुद्यांवर समितीने आक्षेपही नोंदविले. तक्रारदारांशी संवाद साधताना पथकप्रमुख खांडेकर यांनी वस्तुनिष्ठ चौकशीचे आश्वासन दिले.

तक्रारकर्त्यांशी साधला संवाद! नगर पालिका प्रशासनाचे अमरावती विभागीय उपायुक्त संतोष खांडेकर, सुप्रिया टवलारे आणि अभियंता मेटे यांच्या त्रिसदस्यीय समितीने मंगळवारी खामगाव पालिकेत भेट दिली. तक्रारींच्या अनुषंगाने कागदपत्र आणि दस्तवेजाची तपासणी केली. त्यानंतर दुपारी ४ वाजतानंतर या तिन्ही अधिकाºयांनी मुख्याधिकारी मनोहर अकोटकर, बांधकाम अभियंता मस्के, नगर रचना विभागाचे पंकज काकड यांच्या उपस्थितीत नटराज गार्डनचे स्थळ निरिक्षण केले. यावेळी नटराज गार्डनच्या दोन्ही नकाशाची पाहणी केली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा