नटराज गार्डन अनियमितता प्रकरणी विभागीय उपायुक्तांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 10:57 AM2021-08-11T10:57:52+5:302021-08-11T10:57:59+5:30
Khamgaon News : उपायुक्त संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात एक त्रिसद्स्यीय पथक मंगळवारी सकाळीच खामगाव पालिकेत धडकले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक नटराज गार्डन बांधकामात अनियमिततता झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंगळवारी स्थळ निरिक्षण करण्यात आले. यासाठी उपायुक्त संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात एक त्रिसद्स्यीय पथक मंगळवारी सकाळीच खामगाव पालिकेत धडकले होते. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली होती.
नटराज गार्डन प्रकरणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही राजकीय तक्रारींचाही समावेश आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते भिकुलाल जैन, नंदलाल भट्टड, महेश देशमुख आणि नगरसेवक अब्दुल रशीद आदींच्या तक्रारींचा समावेश आहे. प्रारंभी मुख्याधिकाऱ्यानी स्थळ निरिक्षण केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही चौकशी झाली होती. , समाधानकारक चौकशीचा मुद्दा उपस्थित करीत तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे केली होदती.
त्यासंदर्भाने अमरावती येथील उपायुक्त संतोष खांडेकर (नगर पालिका प्रशासन) यांच्या नेतृत्वात त्रिसद्स्यीय पथकाने सविस्तर चौकशी केली. यावेळी काही मुद्यांवर समितीने आक्षेपही नोंदविले. तक्रारदारांशी संवाद साधताना पथकप्रमुख खांडेकर यांनी वस्तुनिष्ठ चौकशीचे आश्वासन दिले.
तक्रारकर्त्यांशी साधला संवाद!
नगर पालिका प्रशासनाचे अमरावती विभागीय उपायुक्त संतोष खांडेकर, सुप्रिया टवलारे आणि अभियंता मेटे यांच्या त्रिसदस्यीय समितीने मंगळवारी खामगाव पालिकेत भेट दिली. तक्रारींच्या अनुषंगाने कागदपत्र आणि दस्तवेजाची तपासणी केली. त्यानंतर दुपारी ४ वाजतानंतर या तिन्ही अधिकाºयांनी मुख्याधिकारी मनोहर अकोटकर, बांधकाम अभियंता मस्के, नगर रचना विभागाचे पंकज काकड यांच्या उपस्थितीत नटराज गार्डनचे स्थळ निरिक्षण केले. यावेळी नटराज गार्डनच्या दोन्ही नकाशाची पाहणी केली.