शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एक दिवा वंचितांसाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:44 IST

धामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे  कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या  जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या  सरपंच विमल कदम यांनी कुटुंबासमवेत मागासवस्तीत  भाऊबिज साजरी केली व एक दिवा वंचितासाठी हा उपक्रम  राबविला. 

ठळक मुद्देसिंदखेड सरपंचाचा उपक्रम मागासवस्तीत भाऊबीज साजरीलोकमत प्रेरणावाट

नवीन मोदे । लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे  कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या  जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या  सरपंच विमल कदम यांनी कुटुंबासमवेत मागासवस्तीत  भाऊबिज साजरी केली व एक दिवा वंचितासाठी हा उपक्रम  राबविला. यावेळी प्रवीण कदम, विनोद कदम, अँड.गणेशसिंग राजपूत  यांना मागासवर्गीय वस्तीतील सुमारे ६५ महिलांनी औक्षण केले.  सामाजिक कार्यकर्ते प्रविण कदम यांचे वतीने सदरहू महिलांना  साडी-चोळी भेट देण्यात आली. अनेक वर्षे ज्यांनी भाऊबीज  साजरी केली नाही. ज्यांना भाऊ नाही, अशा अनेक दिनदुबळ्या  महिलांना यानिमित्ताने भाऊ मिळाला. त्यांचा आनंद त्यांच्या  चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. सिंदखेडच्या सरपंच विमल  कदम यांनी गावात अनेक कामे स्वखर्चाने करून गाव आदर्श  बनविले. त्यांचे कुटुंब मागील दोन वर्षापासून मागासवस्तीत  भाऊबीज साजरी करीत आहे. यावर्षी सिंदखेड येथील  मागासवस्तीत यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी अँड. गणेशसिंग राजपूत, पं.स.सभापती पुष्पा  चव्हाण, उखा चव्हाण, सरपंच विमल कदम, ग्रामपंचायत  पदाधिकारी प्रविण कदम, अर्जुन कदम यांचेसह गावकरी उपस् िथत होते.अँड. गणेशसिंग राजपूत यांनी प्रविण कदम यांचा उपक्रम  प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगितले. तर सर्वत्र समाजा- समाजात दरी वाढत असताना भेदभाव वाढत असताना  भाऊबिजेच्या या निमित्ताने बहिण-भावाच्या नात्याचे नवे पर्व  सुरू होवून वंचितांना आधार मिळाला. तसेच फक्त भाऊबिजच  नव्हे तर संकटात असताना कधिही हाक द्या असे यावेळी प्रविण  कदम यांनी सांगितले. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता  घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे, यापासून प्रेरणा घेत  अनेकांनी कार्य केले तर वंचित, दलित, मागास हे फक्त शब्द  नाही तर समाज आहेत याची जाणीव होईल.

वंचित, दलित, मागास समाजातील परिस्थिती अस्वस्थ करते,  त्यांच्या जिवनात काही क्षण आनंदाचे यावे यासाठी एक दिवा  वंचितासाठी हा उपक्रम. ग्रामपंचायत, आ.सपकाळ यांच्या  माध्यमातून या समाजासाठी भरिव काम करण्याचा संकल्प  आहे.- प्रविण कदम, सिंदखेड.

टॅग्स :diwaliदिवाळी