शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ‘विघ्न’ दूर

By admin | Updated: September 9, 2014 21:27 IST

विघ्नहर्त्याला निरोपावेळी बरसला वरूणराजा; पीक-पाण्याची चिंता मिटली.

बुलडाणा : सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९२२.५0 मिमी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ७0.९६ टक्के असून, सर्वाधिक म्हणजे ११४ मिमी. पाऊस बुलडाणा तालुक्यात पडला आहे. त्या खोलाखाल ९0 मिमी. पाऊस हा मेहकरमध्ये ९९ तर मोताळय़ात ९0 मिमी. पाऊस नोंदविला गेला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प ह्यफुगलेह्ण असून, नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत. वान प्रकल्पात ९१.६८ टक्के, पेनटाकळी ५७.१३ टक्के, तोरणा २९.५३ टक्के, उतावळी ७0.७४ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १४ सिंचन तलाव १00 टक्के भरले असून, १४ सिंचन तलाव हे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्या गेले आहेत. ** तीन तालुक्यात अतवृष्टीजिल्ह्यात शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी संध्याकाळी चांगलाच जोर धरला. आज सकाळी ८ वाजेपर्यंत बुलडाणा, मेहकर व जळगाव जामोद या तीन तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाली. ** नळगंगा जलसाठय़ात दीड फूट वाढनळगंगा धरणाच्या पाणी पातळीत दीड फुटाची वाढ झाली असून, धरण ४६ टक्के भरले आहे. आठवडापूर्वी धरणात ३७ टक्के पाणी होते. नळगंगा धरणाची पूर्ण क्षमता ६६ फु टाची आहे. सध्या धरणामध्ये ५२ फूट पाणीसाठा आहे. पलढग प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे.नदीकाठावर राहत असलेल्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ** पैनगंगा व भोगावती नदीला पूरपैनगंगा नदीला यावर्षीच्या पावसाळ्यातील हा पहिलाच पूर असल्याने मेहकरवासीयांची पूर पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. पैनगंगा नदीवरील पूल ब्रिटिशकालीन असून, तो केव्हाही धोकादायक ठरू शकतो, पुरामुळे या पुलावरुन वाहतूक थांबवून सर्व वाहने बायपास मार्गाने वळवावे लागले. सिंदखेडराजा तालुक्यातील भोगावती नदीला पूर आला आहे; तसेच इतर नदी-नालेही दुथडी भरुन वाहत आहेत. ** येळगाव फुल्ल.बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात १00 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित गोडबोले दरवाजे उघडले आहेत. बुलडाणा शहराला संपूर्ण वर्षभराच्या पाण्याची तरतूद हा प्रकल्प भरल्याने झाली आहे.