शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

निकषामुळे जिल्हा दुष्काळ कक्षेबाहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:28 AM

बुलडाणा : दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषांचा जिल्ह्याला फटका बसला आहे. त्यातच सुधारित पैसेवारीही ६४ पैसे आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ही पैसेवारी जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देपुणे कृषी आयुक्तालयाकडे पाठविला अहवाल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषांचा जिल्ह्याला फटका बसला आहे. त्यातच सुधारित पैसेवारीही ६४ पैसे आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ही पैसेवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, अंतिम पैसेवारी ३0 नोव्हेंबरला जाहीर होणार असली तरी, सुधारित पैसेवारीमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. त्यातच कृषी विभागाकडून पाठविण्यात आलेल्या अहवालातही जिल्ह्यात स्थिती सर्वसाधारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.परिणामी, बुलडाणा जिल्ह दुष्काळाच्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट होत आहे. तसा अहवालही कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण आणि परिभाषा बदलली आहे.  यापूर्वी खरीप हंगामाची नजरअंदाज, सुधारित आणि अंतिम पैसेवारी तथा पावसाच्या वार्षिक सरासरीच्या आधारावर  दुष्काळप्रश्नी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जात होती; मात्र आता दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती बदलली आहे. केंद्र शासनाने ती निर्धारित केली आहे. २0१७ च्या खरीप हंगामापासून ती लागू झाली आहे.यातील पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृद्रा आर्द्रता आणि जलविषयक या चार निकषांच्या आधारावर दुष्काळासंदर्भात निर्णय घेण्यात येतो. त्यासंदर्भात विचार करता बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १0७ टक्के पाऊस पडला आहे. या चारही निकषांचा विचार करता किमान तीन निकष हे नकारात्मक असल्यासचे दुष्काळी स्थितीसाठी गृहित धरण्यात येतात; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती त्या तुलनेत बहुतांश निकषावर सर्वसाधारण आणि मध्यम स्वरुपाचे आले आहेत. परिणामस्वरूप बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुके दुष्काळाच्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा अहवालही पुणे  कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने सायाबीन पिकाला शेतकरी महत्त्व देतो; मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन पिकाची एकरी झडती कमी आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफीचा मुद्दाही शेतकर्‍यांसाठी अडचणीचा असून, हे निकष शेतकर्‍यांचे नुकसान करणार आहे. याचा आपण निषेध करतो.- राहुल बोंद्रे, आमदार तथा जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष